लुटा चित्रपट, वेब सीरिजचा आनंद; ओटीटीवर मालिका, चित्रपटांचा पाऊस

पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यात ओटीटीवर रिलीज झालेल्या व होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी घेऊन आलो आहोत. १८ मार्च ते २४ मार्च दरम्यान, तुमच्याकडे ओटीटीवर पाहण्यासाठी भरपूर कंटेंट असणार आहे. नवीन आणि जुने दोन्ही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत.

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
21st March, 10:06 pm
लुटा चित्रपट, वेब सीरिजचा आनंद; ओटीटीवर मालिका, चित्रपटांचा पाऊस

ऐ वतन मेरे वतन

'ए वतन मेरे वतन' २१ मार्च रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. 'ए वतन मेरे वतन'मध्ये सारा अली खान उषा मेहता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. उषा मेहता यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी १९४२ मध्ये भारतातील पहिले भूमिगत रेडिओ स्टेशन सुरू केले. या चित्रपटात सारा अली खानशिवाय इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


फाइटर

२०२४ चा पहिला सुपरहिट चित्रपट ‘फाइटर’ आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनीत हा चित्रपट २१ मार्चला नेटफ्लिक्सवर धडकला आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १९९.४५ कोटींची कमाई केली होती.


अब्राहम ओझलर

जयराम आणि मामूट्टी यांचा मल्याळम चित्रपट 'अब्राहम ओझलर' देखील या आठवड्यात ओटीटीवर प्रसारित झाला आहे. हा चित्रपट २० मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. हा एक शोधात्मक थ्रिलर चित्रपट आहे. या वीकेंडला डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.


लाल सलाम (तमिळ)

या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत असून रजनीकांत यांचाही एक कॅमिओ आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे, ज्याचे दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिने केले असून संगीत ए आर रहमानने दिले आहे. हा चित्रपट २२ मार्च रोजी ओटीटी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे, मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


ओपेनहायमर

ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर या वर्षी ७ ऑस्कर जिंकणारा हॉलिवूड चित्रपट 'ओपेनहायमर' चा आनंद आता तुम्ही घेऊ शकता. हा चित्रपट २१ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे.


लुटेरे

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'शाहिद' चित्रपटाव्यतिरिक्त 'स्कॅम १९९२' सारखी सुपरहिट वेब सीरिज बनवणारे हंसल मेहता आता 'लुटेरे' घेऊन येत आहेत. याचे दिग्दर्शन जय मेहता यांनी केले आहे. ही मालिका डिन्से प्लस हॉटस्टारवर २२ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.


स्वातंत्र्यवीर सावरकर

रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे यांचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट २२ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रणदीप हुड्डा यांनी केले आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे.


मडगाव एक्सप्रेस

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ‘मडगाव एक्स्प्रेस’ हा चित्रपट टक्कर देणार आहे. कुणाल खेमू लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात दिव्येंदू शर्मा, पक्षिक गांधी, अविनाश तिवारी आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत आहेत.