पुढच्या वर्षी ईदला सलमानचा ‘सिकंदर’

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
11th April 2024, 08:25 pm
पुढच्या वर्षी ईदला सलमानचा ‘सिकंदर’

ईदच्या मुहूर्तावर सलमान खानने त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास दिग्दर्शित करणार असून त्यांनी यापूर्वी 'गजनी', 'हॉलिडे' आणि 'अकिरा' या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. साजिद नाडियादवाला याचे निर्माते असतील.

गुरुवारी ईदच्या खास मुहूर्तावर सलमानने सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाची घोषणा केली. एक पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले, 'या ईदला, 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'मैदान' पहा आणि पुढच्या ईदला या आणि 'सिकंदर'ला भेटा... तुम्हा सर्वांना ईदच्या शुभेच्छा.'

निर्माता साजिद नाडियादवालासोबत सलमानने 'जुडवा', 'मुझसे शादी करोगी' आणि 'किक'सह अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 'सिकंदर'पूर्वी मुरुगदास आणि सलमानने २०१४ मध्ये रिलीज झालेल्या 'जय हो' चित्रपटातही एकत्र काम केले होते. मुरुगदास हे त्या चित्रपटाचे लेखक होते.

गेल्या १० वर्षांत सलमानचे ईदला ७ चित्रपट

आता सलमान खानच्या ईद कनेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या १० वर्षांत सलमानचे केवळ २ सिनेमे इदच्या दिवशी रिलीज झाले नाहीत. २०२० आणि २०२२ मध्ये ईदला चित्रपट रिलीज झालेले नाहीत. २०१५ ते २०२४ पर्यंत सलमान खानचे ७ चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले आहेत.