महिंद्रा, किया आणि होंडाच्या 'या' कारचे सेफ्टी रेटिंग जाहीर; कोणती कार सर्वात सुरक्षित ?

महिंद्रा बोलेरो निओची सध्याची एक्स-शोरूम किंमत रु. ९.९० लाख ते रु. १२.१५ लाख आहे. त्याच वेळी, किया करेन्स ची एक्स-शोरूम किंमत रु १०.५२ लाख ते रु१९.६७ लाख रुपये आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th May, 01:03 pm
महिंद्रा, किया आणि होंडाच्या 'या' कारचे सेफ्टी रेटिंग जाहीर; कोणती कार सर्वात सुरक्षित ?

मुंबई : रस्ते अपघातांबद्दल चिंतित असलेले ग्राहक आता कारच्या सुरक्षा रेटिंगला खूप महत्त्व देत आहेत. कार खरेदी करताना ग्राहक आता त्यांच्या बजेटसोबतच सेफ्टी फीचर्सकडेही लक्ष देत आहेत. ग्लोबल एनसीएपी रेटिंगवरून तुम्ही कारच्या सेफ्टी रेटिंगबद्दल देखील जाणून घेऊ शकता. ग्लोबल NCAP द्वारे नुकतीच अनेक प्रसिद्ध 'मेड इन इंडिया' चारचाकींची टेस्ट घेतली गेली आणि त्यांना एडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन आणि चाइल्ड प्रोटेक्शन मधील कामगिरीच्या आधारावर १  ते ५  स्तर सुरक्षा रेटिंग दिली गेली. ग्लोबल NCAP टेस्ट केलेल्या गाड्यांमध्ये ने किया मोटर्सची ' किया करेन्स एमपीव्ही, होंडा मोटर्सची अमेज  आणि महिंद्राची कॉम्पॅक्ट एसयूवी बोलेरो निओ यांचा समावेश आहे.कार सुरक्षा रेटिंग- इंडिया टीव्ही पैसा

किया करेन्स एमपीव्हीला कोणते रेटिंग मिळाले?

ग्लोबल NCAP ने किया मोटर्सची ' किया करेन्स एमपीव्हीची क्रॅश चाचणी केली आणि करेन्सला ३ स्टार रेटिंग दिले. नवीन प्रोटोकॉलनुसार, केरेन्सला एडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन  आणि चाइल्ड प्रोटेक्शन कॅटेगरीमध्ये ३  स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. केरेन्समध्ये स्टँडर्ड फीचर म्हणून ६  एअरबॅग दिल्या आहेत. किया करेन्स एमपीव्हीची एक्स-शोरूम किंमत रु १०.५२ लाख ते रु१९.६७ लाख रुपये आहे.किआ कैरेंस को शुरुआती टेस्ट में 0 स्टार के बाद ग्लोबल एनसीएपी क्रैश टेस्ट  में 3 स्टार मिले

होंडा अमेझ २  स्टार रेटिंग

ग्लोबल एनसीएपीने होंडाच्या कॉम्पॅक्ट सेडान अमेझची क्रॅश चाचणी घेतली. या चाचणीत कारला २  स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहे. होंडा अमेझला एडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन कॅटेगरीमध्ये २ स्टार मिळाले. त्याच वेळी, याला चाइल्ड प्रोटेक्शन कॅटेगरीमध्ये शून्य रेटिंग मिळाले.होंडा अमेझची एक्स-शोरूम किंमत रु ७.२० लाख ते ९.९६ लाख रुपये आहे. होंडा अमेज को ग्लोबल NCAP में मिली 2-स्टार रेटिंग, जानिए इसके सेफ्टी फीचर

महिंद्राच्या बोलेरो निओला अत्यंत खराब रेटिंग मिळाले 

ग्लोबल एनसीएपीच्या क्रॅश चाचणीमध्ये महिंद्र अँड महिंद्राच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही बोलेरो निओला अत्यंत खराब रेटिंग मिळाले आहे. बोलेरो निओला फक्त १ स्टार रेटिंग मिळाले आहे. नवीन ग्लोबल एनसीएपी प्रोटोकॉलनुसार, बोलेरो निओला एडल्ट अँड चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन कॅटेगरीमध्ये फक्त १ स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे, जे सुरक्षा रेटिंगच्या दृष्टीने खूपच खराब आहे. महिंद्रा बोलेरो निओची सध्याची एक्स-शोरूम किंमत रु. ९.९० लाख ते रु. १२.१५ लाख आहेसेफ्टी रेटिंग में टांय टांय फिस्स निकली Mahindra की ये SUV, मिला सिर्फ 1  स्टार - Global NCAP Gives Only 1 Star Safety Rating For Mahindra Bolero Neo  SUV | Times Now Navbharat


हेही वाचा