पुष्पा-२मध्ये ६ मिनिटांसाठी ६० कोटी खर्च!

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
11th April, 08:29 pm
पुष्पा-२मध्ये ६ मिनिटांसाठी ६० कोटी खर्च!

अल्लू अर्जुन 'पुष्पा २' चे शूटिंग पूर्ण करण्यात खूप व्यस्त आहे. हा चित्रपट या वर्षी रिलीज होणार आहे आणि दिग्दर्शक सुकुमार थिएटरमध्ये मोठ्या प्रदर्शनाची तयारी करत आहेत. मात्र, या चित्रपटाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. सहा मिनिटांचा सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांनी सुमारे ६० कोटी रुपये खर्च केल्याचे आणि सीन पूर्ण होण्यासाठी ३० दिवस लागले असल्याचे नवीन अहवालातून समोर आले आहे.

दरम्यान, अशीही बातमी आहे की पुष्पा २ चे बजेट ५०० कोटी रुपये आहे. या चित्रपटाने जगभरातील संगीत हक्क आणि हिंदी सॅटेलाइट अधिकार टी-सीरिजला ६० कोटी रुपयांना विकले आहेत. ‘स्टार मा’ या चॅनेलने तेलुगू सॅटेलाइट राइट्सही विकत घेतल्याचे बोलले जात आहे. हा व्यवहार किती रुपयांना झाला याची अद्याप माहिती नाही. दरम्यान, नेटफ्लिक्सने १०० कोटी रुपये देऊन डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतल्याची चर्चा आहे. निर्मात्यांनी अद्याप या चर्चांकडे लक्ष दिलेले नाही किंवा कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.