सेक्स स्कँडल प्रकरण: फरार असलेल्या प्रज्वल रेवण्णाविरोधात एसआयटीतर्फे लुकआऊट नोटीस जारी

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
02nd May, 03:28 pm
सेक्स स्कँडल प्रकरण: फरार असलेल्या प्रज्वल रेवण्णाविरोधात एसआयटीतर्फे लुकआऊट नोटीस जारी

बेंगळुरू : विशेष तपास पथकाने (एसआयटी) माजी पंतप्रधान एचडी यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. प्रज्वलच्या विरोधात लूकआउट नोटीस जारी करण्यात आल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली  आहे. त्याच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून तो आता जर्मनीत आहे.Karnataka forms SIT to probe 'obscene videos' case allegedly involving  JD(S) MP Prajwal Revanna

यापूर्वी प्रज्वलने एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी सात दिवसांचा अवधी मागितला होता. त्याच दिवशी, एसआयटीने प्रज्वल आणि त्याचे वडील एचडी रेवण्णा यांनाही नोटीस बजावली. दोघांनाही पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे आरोपी बनवण्यात आले आहे. नोटीस जारी झाल्यानंतर प्रज्वलला देशात प्रवेश करताच ताब्यात घेण्यात येईल.Ex-PM's grandson, MP, now sex offender? The case against Prajwal Revanna |  India News - Times of India

'सत्य लवकरच बाहेर येईल'

मंगळवारी कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने प्रज्वल आणि त्याच्या वडिलांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. समन्सला उत्तर देताना, प्रज्वलने बुधवारी एक्सवर पोस्ट केले की 'मी चौकशीत सहभागी होण्यासाठी बेंगळुरूमध्ये नसल्यामुळे मी माझ्या वकिलांमार्फत सीआयडीकडे संपर्क साधला आहे. सत्य लवकरच बाहेर येईल."K'taka HC disqualifies JD(S) leader Prajwal Revanna as MP from Hassan |  udayavani

या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केल्यानंतर प्रज्वल देश सोडून पळून गेला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर तातडीने कारवाई न केल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा