सत्तेत आल्यानंतर ‘पक्षांतर बंदी’ कायदा करणार बळकट : काँग्रेस

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd May, 03:23 pm
सत्तेत आल्यानंतर ‘पक्षांतर बंदी’ कायदा करणार बळकट : काँग्रेस

पणजी : काँग्रेस सत्तेत आल्यावर पक्षांतर बंदी कायद्यातील दहावे परिशिष्ट आणखी बळकट केले जाईल. हे झाल्यानंतर जुलै महिन्यापर्यंत देशातील १५ राज्यांतील भाजप सरकार कासळेल, असा दावा राष्ट्रीय काँग्रेसचे मीडिया प्रभारी पवन खेरा यांनी केले.

पणजी येथील काँग्रेस भवनात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, एआयसीसी मीडिया प्रभारी हर्षद शर्मा, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर आणि मीडिया प्रमुख अमरनाथ पणजीकर उपस्थित होते. संविधानाबाबत काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस हे स्पष्ट बोलतात. त्यांच्या विधानाचा भाजपने विपर्यास केला, असेही खेरा यावेळी म्हणाले.

माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा नातू हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा हा लैंगिक छळात गुंतलेला असून एसआयटी स्थापन झाल्यानंतर तो जर्मनीला पळून गेल्याचे सांगितले. त्याचे २९०० अश्लील व्हीडिओ आहेत. हा जगातील सर्वात मोठा लैंगिक गुन्हा आहे. पंतप्रधान मोदींना त्यांच्या गुन्ह्यांची माहिती असूनही त्यांनी त्यांचा प्रचार केला. सत्ता मिळविण्यासाठी भाजप एवढ्या खालच्या पातळीवर गेले हे अस्वीकार्य आहे’, असेही ते म्हणाले. गोवा हे आपल्या देशाचे अनमोल रत्न आहे. यासाठी या राज्याला ‘कोल हब’मध्ये बदलू देणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. 

हेही वाचा