दुबईसह अबुधाबीला वादळी पावसाचा जबर तडाखा; बस, विमानसेवा ठप्प

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd May, 03:24 pm
दुबईसह अबुधाबीला वादळी पावसाचा जबर तडाखा; बस, विमानसेवा ठप्प

अबुधाबी : गेल्या महिन्यात संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये आलेल्या भीषण पूरानंतर काही दिवसांनी म्हणजे आज (ता. २) पहाटे अबुधाबी आणि दुबईला मुसळधार पाऊस आणि वादळाचा तडाखा बसला. यानंतर येथील विमानसेवा ठप्प झाली आहे. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दुबईतील बससेवाही बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा

दुबईच्या वाळवंटात महापूर! दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात का पडला? वाचा कारण

अंतराळातून असा दिसत होता दुबईचा पूर, नासाने जारी केली छायाचित्रे

खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, दुबईला येणारी पाच उड्डाणे रात्रभर वळवण्यात आली होती. तर नऊ येणारी आणि चार जाणारी उड्डाणे रद्द करण्यात आली. अमिरातीच्या अनेक उड्डाणेही रद्द करण्यात आल्याचे नमूद केले आहे. दुबईतील नागरिक गुरुवारी पहाटे ३ वाजता जोरदार वारा, ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटाने जागे झाले. त्यानंतर पावसाचा मारा सुरू झाला. तब्बल एक तास पाऊस पडल्यानंतर  देशाच्या हवामान खात्याने ‘एम्बर ॲलर्ट’ जारी केला. त्यानुसार, ३ मेपर्यंत देशात प्रतिकूल हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे.


स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, अबुधाबीच्या काही भागांत आज रस्त्यावर पाणी साचले आहे. तर जेबेल अली, अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ, दुबई इंडस्ट्रियल सिटी, दुबई इन्व्हेस्टमेंट्स पार्क आणि जुमेराह व्हिलेज ट्रँगलमध्ये जोरदार वारे वाहत आहेत.


दरम्यान, दुबई शहरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा बुधवारी संध्याकाळी UAE च्या हवामान खात्याने इशारा दिला. त्यामुळे सरकारने दुबईतील अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सूचना दिली होती. शिवाय अनेक शाळांना शुक्रवारपर्यंत ऑनलाइन वर्ग देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पावसाने पहाटेपासूनच तडाखा दिल्याने लोकांनी घरीच थांबणे पसंत केले.


हेही वाचा