अंतराळातून असा दिसत होता दुबईचा पूर, नासाने जारी केली छायाचित्रे

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
23rd April, 11:58 am
अंतराळातून असा दिसत होता दुबईचा पूर, नासाने जारी केली छायाचित्रे

दुबई : गेल्या आठवड्यात दुबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर हाहाकार माजला होता. १६ एप्रिल ते १७ एप्रिल दरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या मोठ्या भागात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे दुबई आणि अबुधाबीसारख्या शहरांमध्ये अक्षरशः महापूर आला होता. पाऊस इतका जबरदस्त होता की तो अंतराळातूनही दिसत होता. याच विनाशाची साक्ष देणारी छायाचित्रे नासाने जारी केली आहेत. त्यामध्ये पावसाच्या आधी आणि नंतरचा परिसर दाखवला आहे.

हेही वाचा

दुबईच्या वाळवंटात महापूर! दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात का पडला? वाचा कारण


नासाने जारी केलेल्या छायाचित्रांमधील निळा रंग दुबईतील पुरामुळे व्यापलेला भाग दर्शवितो. दुबईचे सर्वात प्रसिद्ध जेबेल अली औद्योगिक क्षेत्र तसेच पाम जेबेल अलीच्या दक्षिणेकडील सर्वत्र उद्याने आणि रस्ते पाण्याने भरली होती. दुबईच्या पावसाचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये मोठ्या इमारती पाण्यात बुडाल्या आहेत. गाड्या पाण्यात तरंगत आहेत. दुबईत मंगळवारी १४२ मिमी पाऊस झाला. तर येथे वर्षभरात सरासरी केवळ ९५ मिमी पाऊस पडतो. म्हणजे, तब्बल दोन वर्षांचा पासून एकाच दिवसात येथे पडला.


नासाच्या उपग्रहाने टिपली छायाचित्रे

पाऊस कमी झाल्यानंतर दोन दिवसांनी शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी नासाचा ‘लँडसॅट-९’ उपग्रह संयुक्त अरब अमिरातीवरून गेला आणि पुराच्या पाण्याच्या मोठ्या, उभ्या असलेल्या तलावांच्या प्रतिमा घेतल्या. नासाचा लँडसॅट ९ उपग्रह मानवी जीवन टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपत्तीचे निरीक्षण आणि निरीक्षण करतो. नासाने जारी केलेल्या फोटोंमध्ये पुराचे पाणी गडद निळ्या रंगात दिसत आहे.


हेही वाचा