पणजी : राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रचारकार्य जोरात सुरू आहे. भाजप, इंडि आघाडी, आरजी आणि अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज भरले असून अनेकांनी प्रचाराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेऱ्यादेखील पूर्ण केल्या आहेत. सगळेच पक्ष संपूर्ण ताकदीने आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उतरले आहेत. एकमेकांवर आरोपाच्या फेऱ्या झाडणे, केलेल्या कामांचा हिशेब मागणे इत्यादी सुरूच आहे. प्रसार माध्यमांवर देखील प्रचार शिगेला पोहोचला आहे.
दरम्यान या सगळ्यात सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे सर्वाधिक मालमत्ता कुणाची ? आकडेबंध पद्धतीने सांगायचे झाल्यास
श्रीपाद यांची मालमता २.५ कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या बँक खात्यांत १७, २३, ४३१ रुपये आहेत. याशिवाय २२,६९,६३२ रुपयांचे बाँड्स, सुमारे ३,११,१४४ रुपयांची बचत, १,१९,८२,६६० रुपयांची देयके, १५,३४,८९६ रुपये किमतीची वाहने, ६,९०,२०४ रुपये किमतीचे दागिने, इतर १९,३५,४२४ रुपयांची मालमता मिळून २ कोटी ५ लाख ६७ हजार ६७२ रुपयांची मालमत्ता असल्याचे नाईक यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे,
दक्षिण गोव्याच्या भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपोंची मालमत्ता
पल्लवी धेंपोंची मालमत्ता सुमारे २५५.४४ कोटी इतकी असल्याचे समोर आले आहे. पल्लवी धेंपो यांच्या बँक खात्यांत सुमारे ९.९१ कोटी रुपये आहेत. याशिवाय सुमारे २१७.११ कोटींचे बाँड्स, सुमारे १२.९२ कोटींची बचत, सुमारे २.५४ कोटींची वाहने, सुमारे ५.६९ कोटींचे सोने तसेच इतर सुमारे ९.७५ कोटी रुपये मिळून आपल्याकडे सुमारे २५५.४४ कोटींची मालमत्ता असल्याचे धेंपो यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
अॅड. खलप यांच्या बचत खात्यांमध्ये १.०७ कोटी रुपये आहेत. बाँड्स, म्युच्युअल फंड आदींमध्ये त्यांची ४५ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे ३.६० लाखांची वाहने आहेत. तर, ३.४७ कोटींची स्थावर मालमत्ता त्यांच्याकडे आहे. त्यांच्या पत्नी निर्मला खलप यांच्याकडे गुंतवणूक, बँक खाती, सोने व इतर मिळून ४.९२ कोटी, तर ६.६१ कोटींच्या जमिनी अशी मिळून ११.५३ कोटींची मालमत्ता असल्याचेही प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे
काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार कॅप्टन विरीयातो फर्नांडिस यांच्याकडे १ कोटी ९५ लाख रुपयांची मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी अनिता यांच्याकडे ३ कोटी ३१ लाख रुपयांची मालमत्ता आहे. दोघांकडे मिळून सुमारे ५.३० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. विरीयातो यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती मिळाली आहे. त्यांनी बुधवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला.
आरजी पक्षाचे उत्तर गोव्यातील उमेदवार मनोज परब यांच्याकडे ३ लाख १२ हजार ४६९ रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी वीणा यांच्याकडे १ लाख ८० हजार रुपयांची मालमत्ता आहे. परब यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती मिळाली आहे.
आरजीचे दक्षिण गोव्याचे उमेदवार रुबर्ट परेरा यांची मालमत्ता २७,६३,६३६ इतकी आहे. रुबर्ट यांच्यावर ५ लाखांचे कर्ज असल्याची माहिती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रांत दिली आहे.