कॅप्टन विरीयातो फर्नांडिस यांच्याकडे १ कोटी ९५ लाख रुपयांची मालमत्ता

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
17th April, 03:16 pm
कॅप्टन विरीयातो फर्नांडिस यांच्याकडे १ कोटी ९५ लाख रुपयांची मालमत्ता
पणजी : विरियातो यांनी गोवा विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी नौदलाच्या आयएनएस शिवाजी, लोणावळा येथून मरीन अभियांत्रिकी केले आहे. त्यानंतर त्यांनी नौदलाच्याच एनआयएटी मधून एअर अभियांत्रिकीमध्ये स्पेशलायझेशन केले आहे. त्यांच्याविरुद्ध मायणा कुडतरी पोलीस स्थानकात एक एफआयआर नोंद आहे. याबाबत मडगाव येथील न्यायालयात खटला सुरू आहे.

 काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार कॅप्टन विरीयातो फर्नांडिस यांच्याकडे १ कोटी ९५ लाख रुपयांची मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी अनिता यांच्याकडे ३ कोटी ३१ लाख रुपयांची मालमत्ता आहे. दोघांकडे मिळून सुमारे ५.३० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. विरीयातो यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती मिळाली आहे. त्यांनी बुधवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

प्रतिज्ञा पत्रानुसार विरीयातो यांच्यावर १ लाख ८९ हजार रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्या नावे कृषी जमीन तसेच व्यवसायिक इमारत नाही. त्यांच्या फ्लॅट, जमीन अशा स्थावर मालमत्तेची किंमत सुमारे १ कोटी २३ लाख रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे एकूण ५० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ते आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडे एकूण तीन चार चाकी असून त्यांची किंमत सुमारे २४.५० लाख रुपये आहे. अनिता यांच्या नावे १५ लाख रुपये किंमतीचे सोने आहे. तर विरियातो यांच्याकडे ४ लाख ३२ रुपये किमतीचे सोने आहे.

विरियातो यांच्या हातात ३८ हजार तर त्यांच्या पत्नी कडे ४१ हजार रुपये रोख रक्कम आहे. विरियातो यांच्या विविध बँक खात्यात मिळून १ लाख ६२ हजार रुपये आहेत. तर त्यांच्या पत्नी अनिता यांच्या बँक खात्यात ३७ लाख ३९ हजार रुपये आहेत. विरियातो यांनी म्युच्युअल फंडमध्ये सुमारे ५७ लाख रुपये गुंतवले आहेत. तर अनिता यांनी शेअर बाझार आणि म्युच्युअल फंडमध्ये मिळून २ कोटी ७ लाख रुपये गुंतवले आहेत. 

विरियातो यांनी गोवा विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी नौदलाच्या आयएनएस शिवाजी, लोणावळा येथून मरीन अभियांत्रिकी केले आहे. त्यानंतर त्यांनी नौडलाच्याच एनआयएटी मधून एअर अभियांत्रिकीमध्ये स्पेशलायझेशन केले आहे. त्यांच्याविरुद्ध मायना कुठंतरी पोलीस स्थानकात एक एफआयआर नोंद आहे. याबाबत मडगाव येथील न्यायालयात खटला सुरू आहे.