नागरी सेवा परीक्षेत १२ वेळा अपयश तरीही कुणालचा सकारात्मक दृष्टिकोण वाखाणण्याजोगा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th April, 12:51 pm
नागरी सेवा परीक्षेत १२ वेळा अपयश तरीही कुणालचा सकारात्मक दृष्टिकोण वाखाणण्याजोगा

नवी दिल्ली : समाजात जगत असताना आपण बऱ्याचदा इतरांच्या सक्सेस स्टोरीमधून प्रेरणा घेत स्वतःच्या आयुष्याचा कायापालट करण्याबाबत विचार करत असतो. यशस्वी लोकं कशी जगतात, त्यांची जीवनशैली किती शिस्तबद्द आहे, त्यांचे वेळापत्रक, त्यांचे एकंदरीत आयुष्य आपण चाळून काढतो. प्रत्येकालाच आपण यशस्वी व्हावे असे वाटणे यात काही गैर नाही. पण बऱ्याचदा आपण यशापेक्षा अपयशातूनच जास्त शिकतो. कधी कधी सर्वस्वी हरल्यानंतरच आपल्या आयुष्याची गोम कळू लागते. मग आपण आपला संघर्ष आणि विजयापर्यंतचा एकूण प्रवास एंजॉय करू लागतो. एकदा काय संघर्षाच्या भट्टीतुन माणूस तावून सुलाखून निघाला की विजय आणि पराजय यांच्यामधील अदृश्य रेषा देखील त्याच्यासाठी गौण ठरतात.  सोबत राहतो तो फक्त अनुभव.. Sisyphus and Sissies – HowdoUteach

नागरी सेवा परीक्षा २०२३ च्या निकालात लखनौ येथील आदित्य श्रीवास्तवने यूपीएससीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तो देशभरात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यासोबतच पहिल्या पाच आणि टॉप टेनमध्ये स्थान मिळविलेल्या उमेदवारांच्या यशाची बरीच चर्चा आहे, परंतु या सगळ्यात निवड होऊ न शकलेला यूपीएससीचा उमेदवार कुणाल विरूळकरची चर्चाच जास्त आहे.

p>एकीकडे  उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार वगैरे होत आहे. पण सध्या सोशल मिडियावर एका पोस्टची विशेष चर्चा होत आहे. १२ वेळा यूपीएससीची परीक्षा देऊनही अपयश हाती आलेल्या कुणालची जिद्द पाहून अनेक जण भारावून गेले आहेत. 'कदाचित जीवनाचे दुसरे नाव संघर्ष आहे' अशा आशयाचा पोस्ट अनेकांच्या डोळ्यांच्या कडा  ओलावून गेला आहे. 

कुणालने आतापर्यंत तब्बल १२ वेळा नागरी सेवा परीक्षा दिली असून ७ वेळा मुख्य परीक्षेस तो पात्र ठरला आहे. तसेच ५ वेळा त्यांनी मुलाखतही दिली आहे. दरम्यान एवढे सगळे करूनही त्याच्या पदरी अपयशच आले आहे. लाखो विद्यार्थी नागरी सेवा परीक्षेत निवड न झाल्याने निराश होतात. सोशल मीडियावर कुणाल विरुळकरच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे यूजर्स त्याचे कौतुक करत आहेत. यामध्ये तो संघर्ष सुरू ठेवण्याबाबत बोलत आहे.

UPSC Civil Services Results 2023 aspirant Kunal R. Virulkar could not crack  exam shared his pain on x | UPSC Results 2023: 'शायद जिंदगी का दूसरा नाम  ही...', 12वें प्रयास में भी

कुणाल विरुलकरने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तो नवी दिल्लीतील यूपीएससी इमारतीबाहेर उभा आहे. नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्येही विरूळकर यांची निवड झाली नव्हती. त्यानंतरही त्यांनी अशीच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२३ मध्ये निवड झालेल्या १०१६  उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ ही १५ ते २४ सप्टेंबर २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.Kunal R. Virulkar 📝 குணால் (@kunalrv) / X

कुणाल हे अभियांत्रिकी पदवीधर आहेत 

त्यांनी त्यांच्या बायोमध्ये लिहिले आहे की ते नागरी सेवा परीक्षेसाठी मार्गदर्शक देखील आहेत. कुणाल सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल देखील आहे. एकीकडे निकालानंतर सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत पास होण्याच्या यशोगाथा सांगितल्या जात आहेत, तर दुसरीकडे कुणालच्या नापास झाल्याचीही चर्चा आहे. कुणालने त्याच्या टाइमलाइनवर दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल युजर्सचे आभारही व्यक्त केले आहेत. यामध्ये युजर्सनी त्याच्या संयमाचे कौतुक केले आहे. त्यांची ही पोस्ट १७ एप्रिलपर्यंत सुमारे २४ लाख लोकांनी पाहिली आहे. या पोस्टवर सतत प्रतिक्रिया येत आहेत.