आसगाव ग्रामस्थांची एकजुटीची हाक

परप्रातींय व्यवसायिकांच्या उपद्रव्याला आळा घालण्यासाठी निर्णय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 12:45 pm
आसगाव ग्रामस्थांची एकजुटीची हाक

म्हापसा :आसगावमध्ये दिल्लीकार व परप्रांतियांकडून मंदिरांतील कार्यक्रमांत अडथळा तसेच नाईट ्नलब थाटून गावातील शांतता बिघडवण्याचा प्ऱयत्न केला जात आहे. या एकंदरीत प्रकाराला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी मंदिर, चर्च आणि गाव एकसंघ करण्याची हाक मारण्यात आली आहे.

रविवारी १४ रोजी सकाळी मुनांगवाडा येथील श्री बारा साखळेश्वर मंदिरामया सभागृहात सर्व देवस्थान समितींमया पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीत गावातील मंदिर समित्यांचे आजी माजी पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच काही चॅपेल समितींचे पदाधिकारी रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवस्थानचे अध्यक्ष सोमाजी सावंत यांमया अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

हल्लीच गावातील एका मंदिरामध्ये धालोत्सव होता. त्यावेळी तक्रार करून काही परप्रांतिय व्यावसायिकांनी या कार्यक्रमात अढथळा आणण्याचा प्ऱयत्न केला. तसेच गुढी पाडव्यामया सणावेळी गुढी उभारण्यामया वेळीही व्यत्यय आणला. मुख्य रस्त्यावरील वाहतूक अडवून लोकांना वेठीस धरण्याचा प्ऱयत्न एका रेस्टॉरन्टकडून केला जातो. मुनांगवाडा येथे मुख्य रस्त्यामया कडेला नाईट ्नलब थाटला जात असून यामुळे गावातील शांततेवर परिणाम होणार आहे. यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांवर परप्रांतिय व्यावसायिकांचा होणारा आघात आणि गावातील धार्मिक सलोखा आणि बिघडवण्याचा होणार प्ऱयत्न हाणून पाडण्यासाठी मंदिरांसह चर्च व चॅपेल समित्यांबरोबरच गाव एकसंघ होण्याची गरज याबैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यानुसार मंदिरे, चर्च व गाव एकजूट करण्याचा एकमुखी निर्ण़य घेण्यात आला.

तसेच सदर नाईट क्लबसह परप्रांतियांची रेस्टॉरन्ट व इतर व्यवसायांची पंचायतीकडून कागदपत्रांची माहिती मिळवणे व या आस्थापनांविरूध्दची कायदेशीर प्रक्रिया हाती घेण्याचा निर्ण़यही या बैठकीत घेण्यात आला.