पल्लवी धेंपोंकडे सुमारे २५५.४४ कोटींची मालमत्ता!

उद्योजक श्रीनिवास धेंपो यांच्याकडे सुमारे ९९४.८३ कोटींची मालमत्ता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th April, 05:24 pm
पल्लवी धेंपोंकडे सुमारे २५५.४४ कोटींची मालमत्ता!

पणजी : भाजपच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांनी सुमारे २५५.४४ कोटींची मालमत्ता दाखवलेली आहे. मंगळवारी अर्ज दाखल केल्यानंतर धेंपो यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे.


पल्लवी धेंपोची गुंतवणूक एकूण मालमत्ता ( स्रोतः निवडणूक आयोग) 

एकूण मालमत्ता ( स्रोतः निवडणूक आयोग) 


देय रक्कम ( स्रोतः निवडणूक आयोग) 

पल्लवी धेंपो यांच्यासह भाजपचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनीही मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जासोबत पल्लवी धेंपो यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे, त्यातून त्यांची मालमत्ता सुमारे २५५.४४ कोटी इतकी असल्याचे समोर आले आहे. पल्लवी धेंपो यांच्या बँक खात्यांत सुमारे ९.९१ कोटी रुपये आहेत. याशिवाय सुमारे २१७.११ कोटींचे बाँड्स, सुमारे १२.९२ कोटींची बचत, सुमारे २.५४ कोटींची वाहने, सुमारे ५.६९ कोटींचे सोने तसेच इतर सुमारे ९.७५ कोटी रुपये मिळून आपल्याकडे सुमारे २५५.४४ कोटींची मालमत्ता असल्याचे धेंपो यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

वाहनांची किंमत ( स्रोतः निवडणूक आयोग) 

दरम्यान, पल्लवी धेंपो या गोव्यातील प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास धेंपो यांच्या पत्नी आहेत. भाजपने यावेळी प्रथमच लोकसभा निवडणुकीची उमेदवारी महिला उमेदवार म्हणून पल्लवी धेंपो यांना जाहीर केलेली आहे. पल्लवी धेंपो यांना दक्षिण गोव्यातून ५० हजारांपेक्षा अधिक मताधिक्क्याने निवडून आणण्याचा चंग भाजप नेत्यांनी बांधलेला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह दक्षिण गोव्यातील इतर मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जोरात प्रचार सुरू आहे.


श्रीनिवास धेंपो यांची गुंतवणूक ( स्रोतः निवडणूक आयोग)