फिलिपाइन्स भारताकडून खरेदी करणार एलसीएच प्रचंड हेलिकॉप्टर; तेजसचीही चर्चा सुरू

-गेल्या दशकभरात भारताने आशियाखंडात 'पूर्वेकडे पहा आणि काम करा' या सामरीक धोरणाच्या अनुषंगाने काम करत पाकिस्तान आणि चीन यांना शह दिला आहे. याचेच फळ म्हणून की काय पूर्व आशियातील अनेक देशांनी भारताच्या व्यापार-वाणिज्य, शिक्षण आणि सांस्कृतिक धोरणांमुळे प्रभावीत होत संधान बांधले आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th April, 01:26 pm
फिलिपाइन्स भारताकडून खरेदी करणार एलसीएच प्रचंड हेलिकॉप्टर; तेजसचीही चर्चा सुरू

मनिला : गयानाला डॉर्नियर-228 विमान दिल्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) लवकरच एक मोठा करार करणार आहे. या डील अंतर्गत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ला एलसीएच प्रचंड हेलिकॉप्टर आणि तेजस लढाऊ विमानांसाठी नवीन खरेदीदार मिळू शकतो. एचएएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सीबी अनंतकृष्णन यांनी सांगितले की, तेजसच्या आधी प्रचंडला निर्यात ऑर्डर मिळण्याची त्यांना अधिक आशा आहे.बीहड़ डोर्नियर 228 टर्बोप्रॉप की कहानी

भारताकडून प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करणारा देश दुसरा कोणी नसून चीनचा कट्टर शत्रू फिलिपाइन्स आहे. प्रचंड अॅसॉल्ट हेलिकॉप्टरच्या कराराबाबत भारत आणि फिलिपाइन्स यांच्यात चर्चा प्रगत टप्प्यात आहे.फिलिपाइन्सने यापूर्वीच भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी केले असून अलीकडेच ते पुरवण्यातही आले आहे.What is the Range of Brahmos Missiles?

एका मुलाखतीत, एचएएलचे सीएमडी अनंतकृष्ण म्हणाले की एलसीए 'तेजस' आपल्या क्लासमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याने परदेशी खरेदीदारांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. “पाच-सहा देशांनी तेजस खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. अर्जेंटिनाशी याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. फिलिपाइन्सशी बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. इजिप्तशीही आम्ही चर्चा करत आहोत. आणि नायजेरियाशी चर्चेला वेग आला आहे.''Know All About Hindustan Aeronautics Limited - Amar Ujala Hindi News Live - हिंदुस्तान  एयरोनॉटिक्स लिमिटेड की विदेशों में साख लेकिन सरकार को कार्यक्षमता पर संदेह

यापूर्वी अर्जेंटिनाने भारताच्या एलसीए तेजसला मागे टाकत डेन्मार्ककडून सेकंड-हँड F-16 खरेदी करण्याचा करार केला आहे. तथापि, अर्जेंटिनाने भारताकडून २० लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) 'प्रचंड' खरेदीसाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.Prachand, India's new Light Combat Helicopter, doesn't yet have main  arsenal or protection suite

फिलिपाइन्स कोस्ट गार्डने आपल्या भारतीय समकक्षासोबत आपल्या पहिल्या सामंजस्य करारावर (MOU) स्वाक्षरी केली, ज्यामुळे सागरी क्षेत्रामध्ये अधिक माहितीची देवाणघेवाण करण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रगत अशा हलके हेलिकॉप्टर MK II आणि स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकांसह भारताने देऊ केलेल्या लष्करी हार्डवेअरमध्ये फिलीपिन्सने उत्सुकता दर्शवली आहे. गेल्या वर्षी, फिलिपिनो कोस्ट गार्ड प्रमुखाच्या भारताच्या पहिल्या भेटीदरम्यान, त्यांनी गोव्यात प्रगत लाइट हेलिकॉप्टर MK III सह प्रात्यक्षिक उड्डाण केले.Understanding the Strategic Shift in South Asia