भाज्यांचे दर स्थिर; लसूण पुन्हा महाग

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th April, 12:24 am
भाज्यांचे दर स्थिर; लसूण पुन्हा महाग

पणजी : पणजी बाजारात मागच्या आठवड्याच्या तुलनेने सोमवारी भाज्यांचे दर स्थिर होते. मात्र, लसणाच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. लसणाचे दर आकारानुसार ३५० ते ४०० रुपये प्रती किलो झाले आहेत. तर मेथीच्या जुडीचे १० रुपयांनी वाढून ३० रुपये झाली. तर मानकुराद आंबाचे दर आकारानुसार एक ते अडीच हजार रुपये डझन होते.
मागच्या आठवड्याच्या तुलनेत पणजी बाजारात कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचे दर १० रुपयांनी कमी झाले. सोमवारी कांदा आणि टोमॅटो ३० रुपये, तर बटाटा ४० रुपये प्रती किलो होता. मिरचीचा दर २० रुपयांनी कमी होऊन १०० रुपये किलो झाला होता. सोमवारी फलोत्पादन गाड्यांवर कांदा २६ रु., टोमॅटो २२ रु., बटाटा ३६ रु. व मिरची ६० रुपये प्रती किलो होती. तर गाजर ३५ रु., कोबी ३१ रु. आणि भेंडी २० रुपये प्रती किलो होती.
पणजी बाजारात सोमवारी लिंबू आकारानुसार ८ ते १० रुपये प्रती नग होता. मटार, शिमला मिरचीचे दर १०० रुपये किलो होते. गाजर, वांगी भेंडीचे दर २० रुपयांनी कमी होऊन ६० रु. प्रती किलो झाले होते. तर दोडका ६० रु., कोबी ३० ते ४० रु., बिन्स १६० रुपये प्रती किलो होते. फ्लॉवरचा दर ४० रुपये प्रती गड्डा होता. याशिवाय कोथिंबीर २० रु., तांबडी भाजी १५ रु., तर पालक १० रुपये जुडी होती.
अंड्यांचे दर उतरले
गेल्या महिन्यात अंड्यांचे दर प्रती डझन ८० रुपयांच्या वर गेले होते. सोमवारी पणजी बाजारात अंड्यांचे दर ६० ते ६५ रुपये प्रती डझन होते.