आसगावात दुचाकीस्वार पर्यटक युवतीचा मोबाईल हिसकावला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd April, 12:26 am
आसगावात दुचाकीस्वार पर्यटक युवतीचा मोबाईल हिसकावला

म्हापसा : आसगाव येथे पर्यटक दुचाकीस्वार युवतीच्या हातातील ४० हजारांचा मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी दोघा दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

ही घटना रविवारी दि. ३१ मार्च रोजी रात्री १०.४५ वा. सुमारास घडली. फिर्यादी शालिनी सिंग (मुंबई) व तिची मैत्रिण रोशनी सिंग या दोघी जीए ०३ एएच ३९०५ क्रमांकाच्या यामाहा फसिनो दुचाकीवरून गुगल मॅपच्या सहाय्याने हणजूणच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी आसगाव येथील सिद्धीविनायक मंदिराजवळ एका दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयित दुचाकीस्वारांनी दुचाकीवर मागे बसलेल्या रोशनी हिच्या हातातील ४० हजारांचा सॅमसंग मोबाईल हिसकावला व घटनास्थळावरून भरधाव वेगाने पळ ठोकली.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सोमवार, १ एप्रिल रोजी संध्याकाळी भा.दं.सं.च्या ३५६, ३७९ व ३४ कलमांतर्गत अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र पाटील करीत आहेत. 

हेही वाचा