आपचे खासदार संजय सिंह यांना अखेर मिळाला जामीन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd April, 05:03 pm
आपचे खासदार संजय सिंह यांना अखेर मिळाला जामीन

नवी दिल्ली : कथित दारू धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना जामीन मंजूर केला. सिंग यांना जामिनावर सोडण्यास अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) कोणताही आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले आहे.

संजय सिंह यांना ४ ऑक्टोबर २०२३ रोजी दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. संजय सिंह ६ महिने तुरुंगात राहिले. पण, त्यांच्याकडे एकही पैसा सापडला नाही. आताही ईडीला संजय सिंग यांना कोठडीत ठेवण्याची गरज का आहे? असे सर्वोच्च न्यायालयाने विचारले.

संजय सिंह यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी यावेळी युक्तिवाद केला. संजय सिंय यांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य आलेले नाही. आरोपपत्रात त्यांचे नाव आरोपी म्हणून कधीच नव्हते. केवळ दोन वेळा एक कोटी रुपये घेतल्याचे सांगण्यात आले. सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ईडीने जामीन अर्जाला विरोध केला नाही. जामिनाच्या अटी कनिष्ठ न्यायालय ठरवेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा