अमेरिकेत मंदिरांची तोडफोड; सिनेटमध्ये ५ खासदारांनी ठेवले बोट!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd April, 04:41 pm
अमेरिकेत मंदिरांची तोडफोड;  सिनेटमध्ये ५ खासदारांनी ठेवले बोट!

वॉशिंग्टन : अमेरिकेत हिंदूंविरोधातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून मंदिरांच्या तोडफोडीच्या घटनाही वाढल्याचे येथील अनेक अहवालांतून समोर आले आहे. अमेरिकेतील पाच खासदारांनी तेथील सिनेटमध्ये (संसदेत) याच प्रश्नावर बोट ठेवत, या सर्व प्रकरणांच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

अमेरिकेतील पाच मूळ भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदारांनी न्याय विभाग आणि फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडून (FBI) यावर्षी देशात हिंदूंविरुद्ध द्वेषपूर्ण वर्तन केले जात आहे आणि मंदिर तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबद्दल तपशील मागितला आहे. या खासदारांमध्ये राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, श्री ठाणेदार, प्रमिला जयपाल आणि अमी बेरा यांचा समावेश आहे.

संशयितांचा पत्ता नाही

भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदारांनी न्याय विभागाच्या नागरी हक्क विभागाच्या क्रिस्टन क्लार्क यांनाही याबाबत पत्र लिहिले आहे. न्यूयॉर्क ते कॅलिफोर्नियापर्यंतच्या मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांमुळे हिंदू अमेरिकन खूप चिंतेत आहेत. या घटनांमध्ये सहभागी असलेल्या संशयितांचा शोध लागला नाही. अनेक हिंदूंना भीती आणि दहशतीमध्ये जगण्यास भाग पाडले जात आहे. त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. कायदेशीर कारवाईबाबत हिंदू समाज चिंतेत आणि अस्वस्थ आहे. कायद्यांतर्गत समान संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी फेडरल एजन्सी योग्य पाळत ठेवत आहे का? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, पाचही खासदार एखाद्या मुद्द्यावर एकत्र येणं फार दुर्मिळ आहे.

हेही वाचा