प्रोग्रेस हायस्कूलने पटकावले विजेतेपद

१७ वर्षांखालील राज्य पातळीवरील फुटबॉल स्पर्धा

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
28th March, 12:34 am
प्रोग्रेस हायस्कूलने पटकावले विजेतेपद

फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केलेल्या प्रोग्रेस हायस्कूल साखळीच्या संघासोबत राज्य क्रीडा आयोजक अनंत सावळ, प्रसाद सुर्लकर व इतर.

केरी-सत्तरी : गोवा सरकारच्या क्रीडा व युवा व्यवहार खात्यातर्फे आयोजित केलेल्या १७ वर्षांखालील राज्य पातळीवरील फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद साखळी येथील प्रोग्रेस हायस्कूलला प्राप्त झाले. प्रोग्रेस हायस्कूलने बेथानी कॉन्व्हेंट हायस्कूलचा २-० ने पराभव केला.
या गटात अनिकेत तेरणे, फ्रॅन्कलीन ग्रॅसियस, स्टीव्ह मोंतेरो, शुबन फोंडेकर, फॅरेन गोन्साल्विस, क्रिस आझावेदो, रवी पटेल, साईराज परवार, सुनील हंसडा, जॉर्वी बार्रेटो, जॉन्सन राणा, निकेश खोईरॉम, लिओ सोरम, क्लीन गोदिन्हो, साकिब वांति, नाथन सांतामारिया व अविदन फर्नांडिस यांचा समावेश होता. फॅरेन गोन्साल्विस व सुनील हंसडा यांनी निर्णायक गोल करून बेथानी कॉन्व्हेंट हायस्कूलचा पराभव केला. विजेत्या प्रोगेस हायस्कूलला शारीरिक शिक्षक प्रसाद सुर्लकर यांचे मार्गदर्शन लाभले. बक्षीस वितरण समारंभाला राज्य क्रीडा आयोजक अनंत सावळ यांची उपस्थिती होती.