दक्षिणेत महिला उमेदवार ही रणनीती नाही, तर सन्मान : सुलक्षणा सावंत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th March, 12:29 am
दक्षिणेत महिला उमेदवार ही रणनीती नाही, तर सन्मान : सुलक्षणा सावंत

पणजी : दक्षिणेत महिला उमेदवार घोषित करणे ही भाजपची रणनीती नाही. ३३ टक्के आरक्षणाची घोषणा लागू होण्यापूर्वीच मोदी सरकारने महिलांना उमेदवारी देऊन महिलांचा सन्मान केला आहे, असे भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुलक्षणा सावंत यांनी सांगितले.

भाजपने दक्षिण गोव्यात लोकसभेसाठी पल्लवी धेंपो यांची महिला उमेदवार म्हणून घोषणा केली. तेव्हापासून विरोधक भाजपवर टीका करत आहेत.

यावर सुलक्षणा सावंत म्हणाल्या की, दक्षिणमध्ये महिला उमेदवाराची घोषणा झाल्याने महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे.

महिला उमेदवार दिल्याबद्दल भाजपवर टीका करणाऱ्या विशेषतः काँग्रेसला सांगू इच्छिते की, आधी तुमचे दोन्ही उमेदवार जाहीर करा आणि मग आमच्याबद्दल बोला.

आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडत असतानाच दक्षिण गोव्यात बैठक घेतली. आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू, असा विश्वास सुलक्षणा सावंत यांनी व्यक्त केला.


मागील २६ वर्षे समाज कार्यात : धेंपो

गोवावासीय आमच्यासोबत आहेत. गोव्यातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टीमुळे आपणास मोठ्या बहुमताने निवडून देतील, असा विश्वास दक्षिण गोव्यातील भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांनी व्यक्त केला. मी गेली २६ वर्षे जनतेच्या सेवेत आहे. शैक्षणिक क्षेत्रात मी कॉलेज आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये माझे काम सुरू ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.