रेणुका बॉईज संघाला विजेतेपद; जाभंळेश्वर उपविजेता ‌

ठाणे पंचायत क्रिकेट प्रीमियर लीग

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th February, 12:25 am
रेणुका बॉईज संघाला विजेतेपद; जाभंळेश्वर उपविजेता ‌

ठाणे पंचायत क्रिकेट प्रीमियर लीगमधील विजेतेपद पटकावणाऱ्या रेणुका बॉईज संघाला बक्षीस प्रदान करताना मान्यवर. 

वाळपई : ठाणे बॉईज यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ठाणे क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे विजेतेपद रेणुका बॉईज संघाला प्राप्त झाले आहे. तर जांभळेश्वर संघाला उपविजेतेपद मिळाले असून या स्पर्धेचे तिसरे पारितोषिक प्रेम कुमार यांच्या राॅयल स्ट्रायकर्स या संघाला मिळाले आहे. सदर स्पर्धा ठाणे पंचायत क्षेत्रासाठी आयोजित करण्यात आली होती.
पंचायत मैदानावर झालेल्या या स्पर्धेत एकूण सहा संघाने भाग घेतला होता. विद्युतझोतातील ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली. या स्पर्धेचे उद्घाटन केरी जि. पं. सभासद देवयानी गावस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सरिता गावकर, उपसरपंच तनया गावकर, पंच सुरेश आयकर, नीलेश परवार, सुभाष गावडे, विनायक गावस, सोनिया गावकर, प्रमिला गावकर. उत्तम गावकर, माजी जि.पं. सभासद पांडुरंग गावकर आदी उपस्थित होते.
यावेळी देवयानी गावस यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्याने आयोजित करणे गरजेचे असून याद्वारे मुलांना प्रोत्साहन मिळते‍. मुलांमध्ये दडलेल्या कौशल्याला वाट मोकळी करून द्यायची असेल तर ग्रामीण भागामध्ये अशा स्पर्धा आयोजित करणे गरजेचे आहे. समाजामध्ये जिवंतपणा निर्माण करण्यासाठी असे उपक्रम आयोजित करणे काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. सरपंच सरिता गावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सूर्या गावकर यांना मालिकावीर, अशोक नाईक याना अंतिम सामान्यातील सामनावीर, शैलेश घाडी यांना उत्कृष्ट गोलंदाज, अर्जुन गावकर यांना उत्कृष्ट फलंदाज आदी वैयक्तिक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.