फेब्रुवारीचा हा आठवडा तुमच्यासाठी खूप मनोरंजक असणार आहे. गुन्हेगारी आणि थ्रिलरने भरलेले चित्रपट आणि मालिका ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत, ज्यामुळे हा तुमचा वीकेंड मजेत जाईल. या आठवड्यात, अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेल्या मालिका ओटीटीला धडकणार आहेत.
पोचर
आलिया भट्टची नवीन वेब सीरिज 'पोचार' २३ फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. 'पोचार' ही सत्य घटनांवर आधारित मालिका आहे, जिथे केरळमध्ये राहणाऱ्या हत्तींची वेदनादायक कथा पाहायला मिळणार आहे.
मलाइकोट्टई वालीबान
साउथ स्टार मोहनलालचा 'मलाईकोट्टई वालीबन' हा चित्रपट आता ओटीटीवर धडक देण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : द बरीड ट्र ुथ
नेटफ्लिक्सच्या नवीन डॉक्यु सीरीज 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी - द बरीड ट्रथ' बद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. ही मालिका २३ फेब्रुवारीपासून ओटीटीवर रिलीज होणार आहे. इंद्राणी मुखर्जीच्या खून प्रकरणाचा यात खुलासा होणार आहे. मात्र, तपास सुरू असल्याने सीबीआय डॉक्युमेंटरी रिलीज करण्यास विरोध करत आहे. परंतु, २० फेब्रुवारी रोजी मुंबई न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. इंद्राणीवर तिची मुलगी शीना बोराच्या हत्येच्या आरोपाखाली खटला सुरू आहे.
अपार्टमेंट ४०४
कोरियन थ्रिलर शो अपार्टमेंट ४०४ देखील या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. हा शो २४ फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. हा शो एका अपार्टमेंटच्या कथेचे अनुसरण करेल जिथे अलौकिक घटना घडत राहतात आणि सहा रहिवाशांना त्यामागील सत्य सापडते.
‘सॉ’ एक्स
अमेरिकन हॉरर चित्रपट ‘सॉ’ एक्स २९ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हा चित्रपट ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'सॉ एक्स' लायन्सगेट प्लेवर २३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रीमियरसाठी सज्ज आहे.
हनुमान
हनुमान हा २०२४ सालचा सुपरहिरो चित्रपट आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केले आहे, तर प्राइमशो एंटरटेनमेंट निर्मित आहे. या चित्रपटात वरलक्ष्मी सरथकुमार, अमृता अय्यर, समुथिराकणी, वेनेला किशोर आणि विनय राय यांच्यासह तेजा सज्जा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २ मार्च रोजी झी-५ वर प्रदर्शित होणार आहे.