जीसीएच्या नावाने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, अज्ञाताविरुद्ध पर्वरी पोलिसांत गुन्हा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st December 2023, 11:38 pm
जीसीएच्या नावाने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, अज्ञाताविरुद्ध पर्वरी पोलिसांत गुन्हा

म्हापसा : गोवा क्रिकेट असोसिएशनच्या नावे क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्याचे आणि संघटनेच्या सचिवांची चुकीची माहितीवजा जाहिरात सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी जीसीएचे कायदेशीर प्रतिनिधी सिद्धेश प्रभूदेसाई यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. अज्ञात संशयिताने दि. १० डिसेंबर रोजी गोवा क्रिकेट असोसिएशनतर्फे गोवा सुपर लीग क्रिकेट स्पर्धा संघटनेच्या मैदानावर आयोजित केली असल्याची जाहिरात वॉटस्अॅपवर प्रसारित केली.

या जाहिरातीवर संघटनेचे सचिव म्हणून राजीव हेगडे यांचे नाव होते. तसेच या जाहिरातीवर संघटनेची अधिकृत ओळख असलेल्या लोगोचाही वापर करण्यात आला. हा प्रकार निदर्शनास येताच संघटनेतर्फे पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली.

जीसीएची जाहिरात सोशल मीडियावर प्रसारित करून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ - सी अन्वये गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल परब करीत आहेत. 

हेही वाचा