तेरेखोल फेरीधक्क्यावर टळली सारमानस दुर्घटनेची पुनरावृत्ती

फेरी धक्क्यातून खाली कोसळली रेंट कार : वाहनचालक सुखरुप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st December 2023, 07:48 pm
तेरेखोल फेरीधक्क्यावर टळली सारमानस दुर्घटनेची पुनरावृत्ती

पेडणे : तेरेखोल केरी फेरी धक्क्यावरून कार थेट पाण्यात गेल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. रेंट कार चालकाच्या चुकीमुळे ही घटना घडली आहे. चालक ध्रुव मित्तल यांना फेरीबोट कर्मचारी व स्थानिकांनी वाचविले.

तेरेखोल केरी फेरी धक्क्यावर शुक्रवार सायंकाळी उत्तर प्रदेश येथील ध्रुव मित्तल आणि त्यांची आई तेरेखोल फोर्टकडे गेली होती. तेथून येताना तेरेखोल फेरी धक्क्यावरून हे वाहन फेरीबोटमध्ये घालायचे होते. फेरी धक्क्याच्या जवळपास त्यांची आई वाहनातून उतरली आणि ध्रुव हे भाड्याने घेतलेली रेंट कार फेरी धक्क्यावरुन फेरीबोटमध्ये घालत होते. यावेळी त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कार फेरी धक्क्याच्या बाजूला पाण्यात कोसळली. त्या ठिकाणी कमी पाणी असल्याने सुदैवाने कोणतीच हानी झाली नाही. फेरी धक्क्यावरील कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि कोस्टल पोलीस यांनी ही कार पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ओहोटी असल्यामुळे फेरी धक्क्यापासून खालच्या बाजूला लागली होती. त्यामुळे वाहनचालकाला त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे कार पाण्यात कोसळले.


हेही वाचा