गोवा ठरले ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन राज्य’

इकॉनॉमिक टाईम्सच्या ट्रॅव्हल अँड टुरिझम अॅन्युअल कॉन्क्लेव्हमध्ये गौरव

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
01st December 2023, 12:45 am
गोवा ठरले ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन राज्य’

मान्यवरांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन राज्य’ पुरस्कार स्वीकारताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे.

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे आयोजित इकॉनॉमिक टाइम्स-ट्रॅव्हल अँड टुरिझम अॅन्युअल कॉन्क्लेव्ह आणि अवॉर्ड्समध्ये गोव्याला उत्कृष्ट पर्यटन राज्य म्हणून गौरविण्यात आले. गोव्याने दोन प्रतिष्ठित पुरस्कार जिंकत जागतिक पर्यटन नकाशावर एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून स्वतःला सिद्ध केले.
गोव्याला मिळालेला दुसरा पुरस्कार ‘बेस्ट फेअर अँड फेस्टिवल स्टेट’ या श्रेणीतील असून गोव्यातील सणांच्या विशिष्ट आणि वैविध्यपूर्ण कालगणा त्यासाठी लक्षात घेतली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, हे पुरस्कार गोव्याला एक उत्कृष्ट स्थळ बनवण्याच्या आमच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहेत. आमचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याची आणि पर्यटकांना अतुलनीय अनुभव देण्यास आम्ही वचनबद्ध आहे.
‘बेस्ट फेअर्स अँड फेस्टिव्हल स्टेट’ या पुरस्काराचे श्रेय गोव्याच्या नवीन वर्षाचे उत्सव, कार्निव्हल सण, हेरिटेज इव्हेंट्सपासून ते ख्रिसमसच्या सणांना जाते. हे कार्यक्रम पाहण्यास दरवर्षी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात.