जमशेदपूर : सर्गिओ लोबेरा आणि त्यांचा ओडिशा एफसी संघ इंडियन सुपर लीग २०२३-२४ (आयएसएल) मध्ये शुक्रवारी यजमान जमशेदपूर एफसीची बचाव भिंत भेदण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. जमशेदपूर येथील जेआरडी टाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर हा सामना होणार आहे. यशस्वी होण्यासाठी नावलौकिक असलेले प्रशिक्षक त्यांच्या कार्यकाळात लवकरात लवकर त्यांचा अधिकार सांगण्यास उत्सुक असतात.
इंडियन टॉप-टायर लीगमध्ये लोबेरा यांच्यापेक्षा अधिक नामांकित असलेले फारच कमी डावपेचकार आहेत. ओडिशा एफसी सोबत त्यांचे देशात परतणे खूप अपेक्षित होते, परंतु पहिल्या सहा सामन्यांमध्ये दोनदा पराभूत होऊन जुगरनॉट्सने लीगमध्ये थोडीशी धक्कादायक नोंद केली. आयएसएल तालिकेतील अव्वल स्थानासाठीची लढाई अगदी थोड्या फरकाची आहे आणि १० गुणांसह (विजय ३, पराभव १, ड्रॉ २) लोबेरा यांचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. सोमवारी सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या एएफसी कप चषक सामन्यात त्यांनी मोहन बागान सुपर जायंटला ५-२ अशा फरकाने पराभूत केल्यानंतर लोबेरा यांनी आपल्या मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे.
रेड मायनर्स जमशेदपूर एफसीने या हंगामात फक्त सात गोल स्वीकारले आहेत आणि त्यांची बचावात्मक दृढता कौतुकास पात्र असताना, त्यांची आक्रमणातील अकार्यक्षमता त्यांच्या समस्यांचे मूळ कारण ठरत आहे. तथापि, ओडिशा एफशीविरुद्धच्या सामन्यात त्यांच्या उत्कृष्ट खेळातून संघ आत्मविश्वास मिळवू शकतो.
महत्त्वाचे खेळाडू
जेरेमी मॅन्झोरो (जमशेदपूर) : मॅन्झोरोने आयएसएल २०२३-२४ मध्ये ९० टक्के ड्रिबल यशाचा दर नोंदवला आहे, ज्यामध्ये प्लेमेकरने जमशेदपूर एफसीच्या दमदार खेळामध्ये अॅलेन स्टेव्हानोविक प्रमाणेच त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
जेरी माविहमिंगथांगा (ओडिशा) : जेरीने पहिल्या दोन सामन्यांमध्ये २ गोल करून मोसमाची शानदार सुरुवात केली. लोबेराने ओडिशा एफसीची सूत्रे हाती घेतल्यापासून विंगर अधिक धारदार झाला आहे आणि सामन्यातील तिसऱ्या टप्प्यात मोठ्या क्षमतेत सहभागी झाला आहे.
आयएसएलच्या इतिहासात जमशेदपूरने ओडिशा एफसीविरुद्ध पाच सामने जिंकले आहेत. नॉर्थईस्ट युनायटेडनंतर (६) जमशेदपूरने एखाद्या संघाविरुद्ध मिळवलेले हे दुसरे सर्वाधिक विजय आहेत. महत्त्वाचे म्हणजे जमशेदपूर एफसीने भुवनेश्वरच्या या क्लबविरुद्ध १९ गोल्स केले आहेत आणि मुंबई सिटी एफसीनंतर आयएसएलच्या एखाद्या टीमविरुद्धची ही सर्वोत्तम गोलसंख्या आहे.
.......
हेड टू हेड
सामने - १२
जमशेदपूर एफसी - ८
ओडिशा एफशी -२