राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मांद्रे विद्यालयाच्या मुलांचे यश

इंटनॅशनल जपान कराटे असो. ऑफ इंडियातर्फे आयोजन

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
29th November 2023, 11:16 pm
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मांद्रे विद्यालयाच्या मुलांचे यश

विजेत्यांसोबत विवेक बोडके, शारीरिक शिक्षक सोमनाथ पार्सेकर व शिक्षिका अनुपा देसाई.(मकबूल माळगीमनी)

कोरगाव : इंटनॅशनल जपान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित गोवा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मांद्रे हायस्कूल मांद्रेच्या मुलांनी घवघवीत यश संपादन केले. पेडे-म्हापसा येथे झालेल्या या स्पर्धेत खालील यशस्वी मुलांनी कराटे खेळातील काटा आणि कुमिती प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली.
सिद्धी रमाकांत असोलकर टीम काटा - तृतीय व टीम कुमिती - द्वितीय, सुरभी संदीप नाईक काटा - प्रथम व कुमिती - प्रथम, समृद्धी रमाकांत असोलकर काटा - तृतीय व कुमिती - द्वितीय, ऋत्वा वैभव नाईक काटा - प्रथम व कुमिती - प्रथम, कनक मेघश्याम मांद्रेकर काटा - तृतीय व कुमिती - तृतीय, प्रज्योती प्रकाश पेडणेकर काटा - तृतीय व कुमिती - द्वितीय, श्रमिका संजय म्हामल काटा - द्वितीय व कुमिती - प्रथम, मनश्री महेश हडफडकर काटा - तृतीय, अव्हिग्न शशिभूषण तळकर काटा - द्वितीय व कुमिती - प्रथम, वंश वामन मुळीक काटा - द्वितीय व कुमिती - तृतीय, गौराक्ष सुदेश हणजूणकर कुमिती - द्वितीय.
विद्यालयातील सर्व विजेत्यांचे मुख्याध्यापक विवेक बोडके, शारीरिक शिक्षक सोमनाथ पार्सेकर, शिक्षिका अनुपा देसाई तसेच शाळा व्यवस्थापन व पालक शिक्षक संघातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.