सोने आयातीमुळे अर्थचक्राची मंदावली गती; याआधीच अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनची बनली असती!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
21st November, 02:31 pm
सोने आयातीमुळे अर्थचक्राची मंदावली गती; याआधीच अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनची बनली असती!

नवी दिल्ली : सोन्याची आयात करणे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी नेहमीच मारक ठरलेले आहे. ही आयात प्रक्रिया बंद केली असती तर कदाचित भारताने ५ ट्रिलियन (५००० अब्ज डॉलर) जीडीपीचे टार्गेट या आधीच पूर्ण केले असते. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अंतरिम सदस्य नीलेश शहा यांनी सोमवारी केलेल्या या टिप्पणीने सामन्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. भारताने गेल्या २१ वर्षांत तब्बल ५०० अब्ज डॉलर खर्च केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सोन्याच्या नादात जीडीपीचा एक तृतीयांश तोटा ?

आम्ही पंतप्रधानांचे ५ ट्रिलियन (५००० अब्ज डॉलर) जीडीपीचे टार्गेट पूर्ण करण्याच्या समीप आहोत. गेल्या ३० वर्षांच्या काळात योग्यरीत्या आर्थिक गुंतवणूक न केल्यानेही बराच फटका एकंदरीत जीडीपीला बसला आहे. या कालावधीत केल्या गेलेल्या एकंदरीत गुंतवणुकीत देशासाठी पूरक असलेल्या धोरणांचा अभाव होता त्यामुळे आपल्या जीडीपीचा एक तृतीयांश तोटा झाला आहे. सोन्याएवजी जर औद्योगिक संसाधनात गुंतवणूक केली असती तर कदाचित भारताची अर्थव्यवस्था एवढ्यात अमेरिकेस टक्कर देत असती, अशीही टिप्पणी शहा यांनी केली.

२०२२ च्या वित्तीय वर्षात, भारताने ३.४ ट्रिलियनपेक्षा जास्त किमतीचे सोने आयात केले होते. २०२१ च्या वित्तीय वर्षाच्या तुलनेत ही वाढ सुमारे ३५ टक्के आहे. यावेळेस भारतीय सोन्याची आयात २.५ ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त होती. 

हेही वाचा