हरमल सरपंचांचा राजीनामा

Story: वार्ताहर । गोवन वार्ता |
21st November 2023, 12:24 am

हरमल : हरमलचे सरपंच बर्नार्ड फर्नांडिस यांनी पदाचा राजीनामा पंचायत संचालकांकडे दिला अाहे. गिरकरवाडा येथील फर्नांडिस कुटुंबीयांशी संबंधित बेकायदा बांधकाम अलीकडेच वादात सापडले होते. या पार्श्वभूमीवर फर्नांडिस यांनी राजीनामा दिला आहे. मात्र आपण इतर कामांत व्यग्र असल्यामुळे सरपंचपदाला न्याय देऊ शकत नसल्याने राजीनामा दिल्याचे बर्नार्ड फर्नांडिस यांनी म्हटले आहे. दरम्यान, हरमल पंचायतीची ग्रामसभा रविवार दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पंचायत सभागृहात होणार आहे.
या ग्रामसभेसमोर ज्यांना सूचना व प्रश्न मांडायचे असतील, त्यांनी लिखित स्वरूपात गुरुवार दि. २३ नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत द्यावेत, असे कळविण्यात आले आहे. दरम्यान, उपसरपंच दिव्या देऊ गडेकर यांनी अलिखित करारानुसार आपला राजीनामा गेल्या महिन्यात दिला असून नवीन उपसरपंचपदाची निवडणूक २३ रोजी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा