एकमेकांना ‘रन आऊट’ करण्यात गेली पाच वर्षे !

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
19th November 2023, 11:59 pm
एकमेकांना ‘रन आऊट’ करण्यात गेली पाच वर्षे !

झुंझुनू (राजस्थान) : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी चुरू आणि झुंझुनू येथे निवडणूक रॅलींना संबोधित केले. यावेळी त्यांनी  ‘रन आऊट’, हिट विकेट आणि मॅच फिक्सिंग अशा शब्दांत सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार ताशेरे ओढले. काँग्रेस सरकारची पाच वर्षे एकमेकांना रन आऊट करण्यात गेली, असे मोदी यावेळी म्हणाले.

मोदींनी काँग्रेस आणि विकास हे एकमेकांचे शत्रू असल्याचे सांगून राज्यातील संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी येथील काँग्रेसचे सरकार हटविणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेस सरकारची पाच वर्षे एकमेकांना रन आऊट करण्यात  गेली. जे उरले आहेत ते महिला आणि अन्य मुद्द्यांवर चुकीचे वक्तव्य करुन हिट विकेट करत आहेत. बाकीचे पैसे, लाच घेऊन ‘मॅच फिक्सिंग’ करत आहेत आणि कोणतेही काम करत नाहीत.

राजस्थानमध्ये भाजप वेगाने विकास करेल आणि हा विजय राजस्थानचा असेल. विजय राजस्थानच्या भविष्याचा असेल, विजय राजस्थानच्या माता, भगिनी, तरुण आणि शेतकऱ्यांचा असेल, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा