दिल्लीत दरोडा... भिंतीला भगदाड पाडून दुकानात शिरले अन् २५ कोटींचे दागिने पळवले!

दिल्लीतील ज्वेलरी शोरूममध्ये दरोडा; सोने, हिऱ्याचे दागिने लंपास, चांदीला मात्र हात लावला नाही

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th September 2023, 03:11 pm
दिल्लीत दरोडा... भिंतीला भगदाड पाडून दुकानात शिरले अन् २५ कोटींचे दागिने पळवले!

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीतून दरोड्याचा एका धक्कादायक आज सकाळी समोर आला आहे. जंगपुरा येथील भोगल भागातील उमराव सिंह ज्वेलरी शॉपच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी २५ कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्याचे दागिने लंपास केले आहेत. ही चोरी काल (२५ सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर घटना घडली.

वरील घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये चोरट्यांनी ज्वेलरी शॉपच्या लॉकर रूममध्ये भिंतींना छिद्र पाडून प्रवेश केल्याचे दिसत आहे. चोरट्यांनी सर्व सोन्याचे व हिऱ्याचे दागिने पळवून नेले. चांदीच्या दागिन्यांना मात्र हात लावला नाही. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आज सकाळी निजामुद्दीन पोलीस घटनास्थळी पोहोचले. नंतर त्यांनी शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.

मिळालेल्या माहितीनुसार, दुकानाचा फलक तुटलेले पाहून शोरूम मालकाला संशय आला. त्यांनी दुकानाचे शटर उघडले असता दुकानातील सर्व हिरे व सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे आढळून आले. दक्षिण पूर्व जिल्ह्याचे डीसीपीही पोलीस पथकासह दुकानात पोहोचले. परिसराची पाहणी करून ते निघून गेले. मात्र, दुकानातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळीवर तपासणी केली आहे.

दरम्यान, चोरीच्या वेळी दुकानातील सुरक्षा यंत्रणेने काम केले नाही. दुकानातील अलार्मही वाचला नाही. याचाही शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. दुकानातील स्ट्राँग रूममधून बहुतांश दागिने लंपास करण्यात आले आहेत.