पंजाब एफसी मोहन बागानला देणार आज टक्कर

आयएसएल : दोन्ही संघ प्रथमच एकमेकांसमोर उभे राहणार

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
22nd September, 11:59 pm
पंजाब एफसी मोहन बागानला देणार आज टक्कर

कोलकाता : गतविजेता मोहन बागान सुपर जायंट शनिवारी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर लीगच्या इतिहासात प्रथमच बढती मिळालेला संघ पंजाब एफसी संघाशी भिडणार आहे. आयएसएलमधील हे दोन्ही संघ प्रथमच एकमेकांसमोर उभे राहणार असून या सामन्यातून मोहन बागान सुपर जायंट इंडियन सुपर लीग (आयएसएल)चे जेतेपद कायम राखण्याच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.
जुआन फेरांडोच्या मोहन बागान संघाने ट्रान्सफर विंडोमध्ये अनिरुद्ध थापा आणि सहल अब्दुल समद सारख्या भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये ताफ्यात दाखल करून घेतले आहे. ज्यामुळे संघाला एक पाऊल पुढे जाण्यासाठी आणि या हंगामात आयएसएल लीग शिल्ड जिंकण्यासाठी प्रेरणा मिळेल. त्यांच्यासाठी दमदार सुरुवात महत्त्वाची आहे. कारण मोहिमेच्या सुरुवातीलाच गुण गमावणे स्पर्धेच्या उत्तरार्धात महागडे ठरू शकते.
पंजाब एफसीने गेल्या वर्षी आय-लीगमध्ये सर्वाधिक ५२ गुण मिळवले. त्यांनी दुसर्‍या श्रेणीत सर्वात जास्त विजय (१६) आणि सर्वात कमी पराभव (२) नोंदवले, त्यामुळे त्यांना बढती मिळवली. विद्यमान आयएसएल ट्रॉफी विजेत्यांविरुद्ध या संधीचा पुरेपूर उपयोग करणे हा त्यांच्या या मोसमातील संभाव्यतेसाठी महत्त्वपूर्ण असेल.
महत्त्वाचे खेळाडू
आक्रमक मिडफिल्डर सहल अब्दुल समद ट्रान्सफरमध्ये केरला ब्लास्टर्सच्या ब्लॉकबस्टर मूव्हमध्ये मोहन बागान सुपर जायंटमध्ये सामील झाला. समदने त्याच्या सर्जनशीलतेने आणि आयएसएल तसेच राष्ट्रीय संघासाठी गोल करण्याच्या संधी निर्माण करण्याच्या क्षमतेने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. त्याला मैदानाच्या मध्यभागी सहकारी मिडफिल्ड स्टार थापासोबत खेळवले जाईल आणि या दोघांचे समन्वय आगामी सामन्यात आणि संपूर्ण मोहिमेतही संघाच्या यशासाठी केंद्रस्थानी असेल.
पंजाब एफसीच्या ल्यूका मॅजेनने गोल-स्कोअरिंग चार्टमध्ये आय-लीग २०२२-२३ मध्ये १६ स्ट्राइकसह अव्वल स्थान पटकावले. त्याने लीगमध्ये प्रत्येक १०४ मिनिटांतून एकदा गोल केला आणि आक्रमणाचे नेतृत्व करणारा तो संघासाठी उपयोगी पडेल. कारण पंजाब आयएसएलमध्ये आपले पाऊल शोधण्याचा प्रयत्न करेल.
पंजाब चांगला संघ आहे. शेवटचा हंगाम त्यांच्यासाठी आश्चर्यकारक होता. त्यांच्यासाठी आयएसएल ही सुरुवात करण्याची मोठी संधी आहे. ते गेल्या मोसमातील (आय-लीगमधील) चॅम्पियन आहेत. हा एक महत्त्वाचा आणि आश्चर्यकारक सामना असेल. मला आशा आहे की आम्ही ९० मिनिटे लक्ष केंद्रित केले आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ तगडा आहे, असे मोहन बागान सुपर जायंटचे रणनीतीज्ज्ञ जुआन फेरांडो म्हणाले.
ओडिशा-चेन्नईयन आज आमनेसामने
इंडियन सुपर लीगच्या १०व्या पर्वात शनिवारी ओडिशा एफसी घरच्या मैदानावर चेन्नईयन एफसीचा पाहुणचार करण्यासाठी सज्ज झाला आहे. भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर २३ सप्टेंबरला ही लढत होणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने आयएसएल विजेते प्रशिक्षक सर्गिओ लोबेरा आणि ओवेन कोयले हेही आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, ओडिशा एफसीच्या घरच्या मैदानावरील ७ सामन्यांत चेन्नईयन एफसीला एकही विजय मिळवता आलेला नाही. चेन्नईयन एफसीने २०१६ पासून केवळ त्रयस्त ठिकाणी (२०२१मध्ये) त्यांच्याविरुद्ध विजय मिळवला आहे.