ऑनलाईन गेम्स, बेटिंग आता जीएसटीखाली

राज्य सरकारकडून दुरुस्ती अध्यादेश जारी


18th September, 11:09 pm
ऑनलाईन गेम्स, बेटिंग आता जीएसटीखाली

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : ऑनलाईन गेमिंंग, लॉटरी, हॉर्स रेसिंंग, गॅम्बलिंग, कॅसिनो, बेटिंंग यांना आता जीएसटी लागू होणार आहे. जीएसटी कायद्यात दुरुस्ती करणारा अध्यादेश गोवा सरकारने जारी केला आहे. राज्यपालांंच्या मंजुरीनंतर माहितीसाठी अधिसूचना जारी झाली आहे. कार्यवाहीच्या तारखेची नंतर स्वतंंत्र अधिसूचना जारी केली जाईल, असे अध्यादेशात म्हटले आहे.

कॅसिनो, हॉर्स रेसिंंग, ऑनलाईन गेमिंंग यांनी जीएसटीखाली आणण्याचा निर्णय जीएसटी मंंडळान घेतला आहे. गोवा सरकारने त्याला पाठिंबा दिला आहे. गोव्याचे प्रतिनिधी म्हणून वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो बैठकीला उपस्थित होते. इंंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन गेम्स खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. कॅसिनोतही ऑनलाईन गॅम्बलिंंग सुरू झाले आहे. लॉटरी, गॅम्बलिंंग, बेटिंंग यांना शुल्क लागू करावे, अशी मागणी विधानसभा अधिवेशनात आमदार मायकल लोबो यांनी केली होती. जीएसटी लागू झाल्याने सरकारी तिजोरीत भर पडणार आहे. जीएसटी कायद्यात कलम ८० ए आनी ८० बी कलमांचा समावेश अध्यादेश जारी करून केला आहे.

इंंटरनेट वा इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या आधारे जे गेम खेळले जातात, त्यांना ऑनलाईन गेमिंंग म्हणतात, असा अर्थ कलम ८० ए मध्ये दिला आहे. बेटिंंग, कॅसिनो, गॅम्बलिंंग, हॉर्स रेसिंंग, लॉटरी, ऑनलाईन मनी गेमिंंग यांचा समावेश कलम १०२ (ए) मध्ये आहे. ऑनलाईन गेम्ससाठी इंंटरनेट वा इलेक्ट्रॉनिक माध्यमाची व्यवस्था करणारा पुरवठादार आहे. त्याला शुल्क भरावे लागेल, असा उल्लेख कलम १०५ मध्ये आहे.

अध्यादेशाचा अन्य कायद्यांंवर परिणाम नाही    

एखादी व्यक्ती विदेशांतून ऑनलाईन गेमसाठी पैसे देत असेल तर त्या व्यवहाराला जीएसटी लागू होईल. याचा उल्लेख कलम २४ मध्ये आहे. या कायद्याद्वारे ऑनलाईन बेटिंंग, गॅम्बलिंंग, लॉटरी, हॉर्स रेसिंंग यावर जी बंंधने आहेत, ती तशीच राहतील. या अध्यादेशाचा अन्य कायद्यांंवर परिणाम होणार नाही, असा उल्लेख अध्यादेशात आहे.

हेही वाचा