कौतुकास्पद! बस ड्रायव्हर, कंटडक्टरचे प्रसंगावधान; गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

Story: न्यूज डेस्क |
11th September 2023, 10:45 pm
कौतुकास्पद! बस ड्रायव्हर, कंटडक्टरचे प्रसंगावधान; गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना झाल्या. यावेळी प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्यांनी तिला सुरक्षितपणे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. बसच्या कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखविल्यामुळे महिलेला वैद्यकीय उपचार मिळाले आणि तिची प्रसूती सुरळीत झाली.
ही घटना रायगड जिल्ह्यातील कोलाड गावाजवळ शनिवारी घडली, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले. रुद्रोली गावातील रहिवासी असलेल्या सुशीला रवी पवार या दुपारी वडखळ येथून पनवेल-महाड बसमध्ये चढल्या आणि प्रवासादरम्यान त्यांना प्रसूती वेदना जाणवू लागल्या. बस चालक देविदास जाधव आणि वाहक भगवान परब यांनी तत्काळ बस कोलाड येथील आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वळवली आणि तिला तेथे दाखल केले, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, खड्डेमय मुंबई-गोवा महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू असून आगामी गणेशोत्सव संपेपर्यंत या रस्त्यावरून अवजड वाहनांना वाहतूक पोलिसांनी बंदी घातली आहे.      

हेही वाचा