मालपे उतरणीवर आणखी एक अपघात

सिमेंट पत्रे नेणारा ट्रक उलटून नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th May 2023, 12:12 am
मालपे उतरणीवर आणखी एक अपघात

पेडणे : मालपे येथे राष्ट्रीय महामार्गावरील उतरणीवर सिमेंटचे पत्रे घेऊन पुण्याहून येणारा ट्रक रस्त्याचा अंदाज न आल्याने उलटला. यामुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सिमेंटचे पत्रे घेऊन पणजीच्या दिशेने ट्रक जात होता. येथे उतरणीवरवर आला असता ट्रक चालकाचा ताबा वाहनावरून सुटल्याने ट्रक उलटला. त्यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मालपे येथे वारंवार अपघात होत असतात. मात्र, सार्वजनिक रस्ता बांधकाम विभाग खाते याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रत्येक आठवड्यात एक- दोन अपघात या ठिकाणी होत असल्याने या भागातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पावसाळा जवळ आल्याने त्या भागातील काम तातडीने हाती घेण्याची गरज होती. मात्र, ते काम पूर्णत्वास येणार असल्याचे दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघातात वाढ होण्याची शक्यता आहे. संबंधित खात्याने तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक, नागरिक करीत आहेत. 

हेही वाचा