हुक्केरीजवळ ३३ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

चालक ताब्यात; कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्कता


27th March 2023, 12:31 am
हुक्केरीजवळ ३३ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

बेळगाव उत्पादन शुल्क पथकाने जप्त केलेल्या दारू व वाहनासह चालक.

प्रतिनिधी। गोवन वार्ता

बेळगाव : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातून गोव्याची दारू कर्नाटकात नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हुक्केरीजवळ बेळगाव उत्पादन शुल्क पथकाने ३३ लाख रुपयांची गोवा दारू जप्त केली.                    

उत्पादन शुल्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी ४ च्या सुमारास ४५० लिटर पॉल जॉन ब्रिलियंस सिंगल माल्ट व्हिस्कीचे ५० बॉक्स जप्त करण्यात आले. महिंद्रा पिकअप वाहन नोंदणी क्रमांक केए ०१ एएम ८९३८ मध्ये दारूची वाहतूक होत होती. याप्रकरणी वाहनचालक धर्मेंद्र जहांगीर याला ताब्यात घेण्यात आले. हुक्केरी विभागाच्या उत्पादन शुल्क निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

कर्नाटक विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याची दारू कर्नाटकात नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बेळगाव जिल्हा अधिकाऱ्यांनी गोव्यातून अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर नजर ठेवली आहे. याआधी १८ मार्च रोजी खानापूर उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी ३,९०५ लिटर दारूचे सुमारे ७०० बॉक्स जप्त केले होते.

हेही वाचा