कपिलच्या ‘झ्विगाटो’कडे प्रेक्षकांची पाठ

|
23rd March 2023, 10:32 Hrs
कपिलच्या ‘झ्विगाटो’कडे प्रेक्षकांची पाठ

कपिल शर्माचा ‘झ्विगाटो’ आणि राणी मुखर्जीचा पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या शुक्रवारी (१७ मार्च) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. राणी मुखर्जी अभिनीत चित्रपटाने प्रेक्षकांना प्रभावित केले परंतु चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. त्याचबरोबर ‘झ्विगाटो’मध्ये कपिलचा दमदार अभिनय असूनही पहिल्याच दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांनी नाकारला.
सोमवारी ‘झ्विगाटो’ने किती केली कमाई
नंदिता दास दिग्दर्शित ‘झ्विगाटो’मध्ये कपिल शर्मा आणि शहाना गोस्वामी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाविषयी बरीच चर्चा झाली, पण पहिल्याच दिवशी तिकीट खिडकीवर चित्रपटाची हवा टाईट झाली आणि चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक दिसला नाही. कपिल शर्मा या चित्रपटात डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत आहे. ‘झ्विगाटो’च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त ४३ लाखांचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ६२ लाखांची कमाई केली. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ७५ लाखांची कमाई केली. त्याचवेळी 'झ्वीगाटो'च्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडेही आले आहेत, जे खूपच निराशाजनक आहेत. प्रत्यक्षात चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशीच सोमवारी २५ लाखांचा व्यवसाय केला आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता २.०९ कोटींवर गेली आहे.
काय आहे ‘झ्विगाटो’ची कथा?
‘झ्विगाटो’ चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, ही एका डिलिव्हरी बॉयची कथा आहे, ज्यावर कुटुंबाच्या जबाबदारीचे ओझे आहे. मानस (कपिल शर्मा) करोनाच्या काळात नोकरी गमावतो आणि डिलिव्हरी बॉय बनतो. यानंतर त्याचे आयुष्य ५ स्टार रेटिंग आणि प्रोत्साहनाच्या जाळ्यात अडकते. ही या चित्रपटाची कथा आहे.