कार्तिक आर्यन बनणार शाहिदचा भाडेकरू


19th January 2023, 11:26 pm
कार्तिक आर्यन बनणार शाहिदचा भाडेकरू

कार्तिक आर्यन स्वतःसाठी घर शोधत होता, आता बातमी येत आहे की अभिनेत्याचा हा शोध पूर्ण झाला आहे. वृत्तानुसार, कार्तिक नुकताच जुहू येथे एका आलिशान घराच्या शोधात आला होता आणि त्याने ते घर फायनल केले आहे.
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या बॉलिवूडचा उगवता स्टार आहे. गेल्या वर्षी भूल भुलैया २ सारखे सुपरहिट चित्रपट देऊन या त्याने चाहत्यांना वेड लावले होते. यावर्षी कार्तिक ‘शेहजादा’ घेऊन येत आहे. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरलाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.
रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यन गेल्या अनेक दिवसांपासून घराच्या शोधात होता. अशा स्थितीत तो शाहिद कपूरच्या जुहू येथील घरी पाहण्यासाठी आला होता. त्याला घर आवडले आणि आता तो भाड्याने घेण्यास तयार आहे. कार्तिक आर्यनने शाहिद कपूरचे हे घर तीन वर्षांसाठी लीजवर घेतले आहे. या घरासाठी कार्तिकने ४५ लाख रुपयेही जमा केले आहेत.
एवढेच नाही तर शाहिद कपूरच्या या घरासाठी कार्तिक आर्यनला दरमहा सात लाख ५० हजार रुपये द्यावे लागतील. दोघांमध्ये झालेल्या करारात दरवर्षी ७ टक्के भाडे वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार, कार्तिक आर्यनला पहिल्या १२ महिन्यांसाठी ७.५ लाख रुपये आणि नंतर दुसऱ्या वर्षी ८.२ लाख रुपये आणि तिसऱ्या वर्षी ८.५८ लाख रुपये भरावे लागतील.
कार्तिकच्या नवीन घराबद्दल बोलायचे झाले तर, हे अपार्टमेंट ३.६८१ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. अपार्टमेंटमध्ये दोन पार्किंग स्लॉट आहेत. यापूर्वी कार्तिक वर्सोवा येथे ४५९ चौरस फुटाच्या अपार्टमेंटमध्ये राहत होता, जो त्याने २०१९ मध्ये १.६० कोटी रुपयांना विकत घेतला होता.