कार्तिक करणार हृतिकच्या बहिणीशी लग्न?

|
29th December 2022, 09:30 Hrs
कार्तिक करणार हृतिकच्या बहिणीशी लग्न?

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक कार्तिक आर्यन त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असतो. कार्तिक आर्यनच्या लग्नाबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत. सध्या कार्तिक आर्यनचे नाव एका मुलीसोबत जोडले जात आहे.
अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान कार्तिक आर्यनने त्याच्या लग्नाबद्दल सांगितले की, तो आणखी दोन-तीन वर्षे लग्नाचा विचार करत नाही. यानंतर एक रिपोर्ट समोर आला, ज्यामध्ये कार्तिक आर्यनचे नाव हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशनशी जोडले गेले. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा दावा या बातमीत करण्यात आला होता. दरम्यान, आता या दोघांबद्दल एक नवीन अपडेट समोर आले आहे, ज्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे.
कार्तिक आर्यनने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो फ्रान्सचा आहे. या फोटोमध्ये कार्तिक आर्यन बाहेर दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पश्मिना रोशनचाही एक फोटो फ्रान्समधून समोर आला होता. त्या फोटोत पश्मिना रोशन तिचा चुलत भाऊ हृतिक रोशनसोबत दिसली होती. आता यामुळे पुन्हा एकदा दोघांच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झडू लागली आहे.