गांजा बाळगल्याप्रकरणी मडगावात कोठडी


03rd December 2022, 12:10 am
गांजा बाळगल्याप्रकरणी मडगावात कोठडी

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

मडगाव : अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी दवर्ली दिकरपाल येथील इस्साक रेगन परेरा (२५) या युवकाला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी संशयिताला न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.            

मडगाव पोलिसांकडून अमलीपदार्थ विक्रीच्या व्यवहारांवरही कारवाई केली जात आहे. पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या नेतृत्वाखाली दवर्ली दिकरपाल येथील इस्साक रेगन परेरा याला गुरुवारी सायंकाळी गांजा बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. संशयिताकडून अर्धा किलो गांजा जप्त करण्यात आला असून बाजारभावानुसार ५५ हजार रुपये किंमत आहे.      

हेही वाचा