जीसीएच्या अध्यक्षपदी विपुल फडके

उपाध्यक्षपदी शांबा देसाई यांची निवड


28th October 2022, 12:02 am
जीसीएच्या अध्यक्षपदी विपुल फडके

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

पणजी : गोवा क्रिकेट असाेसिएशनच्या (जीसीए) अध्यक्षपदी विपुल फडके यांची निवड झाली आहे. त्यांनी चेतन देसाई पॅनलच्या महेश देसाई यांचा तीन मतांनी पराभव केला. जीसीएशी संलग्न १०७ क्रिकेट क्लबांनी या निवडणुकीत मतदान केले होते.                  

विपुल फडके यापूर्वी जीसीएचे सचिव होते. संघटनेच्या सचिवपदी खोर्ली इलेव्हनचे रोहन गावस देसाई याआधीच बिनविरोध निवडले गेले आहेत. खजिनदारपदी दया पागी, तर राजेश पाटणेकर व रूपेश नाईक यांची सहसचिवपदी निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी शांबा देसाई यांची निवड झाली. गुरुवारी जीसीएची  निवडणूक पार पडली. यात फडके पॅनलचे विपुल फडके व रोहन गावस देसाई, तर चेतन देसाई पॅनलचे शांबा देसाई, रूपेश नाईक, दया पागी व राजेश पाटणेकर निवडून आले.

निवडणुकीपूर्वी विपुल फडके म्हणाले होते की, आमच्या कामाचा अनुभव मागील तीन वर्षांत जीसीएशी संलग्न असलेल्या असोसिएशननी घेतला आहे. माझ्या सचिवपदाच्या कारकिर्दीत सर्व स्पर्धा व्यवस्थित पार पडल्या आहेत. सूरज लोटलीकर यांच्या अध्यक्षतेखालील मंडळाचा कारभार पारदर्शक व जबाबदारीने पूर्ण झाला आहे. आमच्या पॅनलला सूरज लोटलीकर यांचा पाठिंबा आहे.

निवडलेले पदाधिकारी

अध्यक्ष : विपुल फडके      

उपाध्यक्ष : शांबा देसाई      

सचिव : रोहन गावस देसाई      

सहसचिव : रूपेश नाईक      

खजिनदार : दया पागी      

सदस्य : राजेश पाटणेकर  

हेही वाचा
सर्व पहा