स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल

नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांची घोषणा

|
04th October 2022, 12:39 Hrs
स्वांते पाबो  यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल

वॉशिंग्टन : स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिकतेसंदर्भातील अभ्यासासाठी त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी याबाबतची घोषणा केली.

स्वांते पाबो हे पॅलेओजेनेटीक्सच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी निएंडरथल जीनोमवर काम केले आहे. ते जर्मनीतील लीपझिंग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्युशनरी एन्थ्रोपोलॉजी येथील जेनेटिक्स विभागाचे संचालकही राहिले आहेत.

गेल्या वर्षीचे वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेन पेटामूटियम यांना देण्यात आले होते. त्यांना शरीराचे तापमान, दाब आणि वेदना या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार दिला होता.

पाबो यांनी एका नामशेष होमिनिनचा शोध लावला. द डेनिसोवा, एका लहान बोटाच्या हाडाच्या नमुन्यातून त्यांनी डाटा गोळा केला. स्वांते पाबो यांना आढळले की, या आता नामशेष झालेल्या होमिनिनपासून होमो सेपियन्समध्ये जनुकांचे हस्तांतरण झाले आहे. सध्याच्या मानवांसाठी जीन्सचा हा प्राचीन प्रवाह आज शारीरिक प्रासंगिकता आहे, उदाहरणार्थ, आपली रोगप्रतिकारक शक्ती संक्रमणांवर कशी प्रतिक्रिया देते यावर परिणाम करते.