बायंंगिणी प्रकल्प २८ महिन्यांत पूर्ण होणार

स्थानिकांचा विरोध; प्रकल्प होऊ देणार नाही : आमदार फळदेसाई

|
21st June 2022, 12:19 Hrs
बायंंगिणी प्रकल्प २८ महिन्यांत पूर्ण होणार

महसूल मंंत्री बाबुश मोन्सेरात

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी :
बायंंगिणी कचरा प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांनी रविवारी मोर्चा काढल्यानंतर हा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. सदर प्रकल्प २८ महिन्यांत पूर्ण होणार आहे, असे महसूल मंंत्री बाबुश मोन्सेरात यांनी सांगितले. दरम्यान, सदर प्रकल्पाला येथील लोकांचा विरोध आहे. त्यामुळे आपण हा प्रकल्प येथे होऊ देणार नाही, असे स्थानिक आमदार राजेश फळदेसाई यांनी सांगितले.
बायंंगिणी कचरा प्रकल्पाची अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानंतर २८ महिन्यांत सदर प्रकल्प पूर्ण होणार अाहे. कचरा व्यवस्थापन खात्याचे मंंत्री बाबुश मोन्सेरात म्हणाले, या प्रकल्पाविरोधात खंंडपीठात याचिका दाखल केल्यानंतर स्थानिकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही या विरोधातील याचिका फेटाळून लावल्या. हा प्रकल्प कायदेशीर आहे त्यासाठीचे आवश्यक सर्व परवाने उपलब्ध असून तो २८ महिन्यांत पूर्ण केला जाणार अाहे, असे मंंत्री मोन्सेरात यांनी सांगितले.
मुख्यमंंत्र्यांंची भेट घेऊन हस्तक्षेपाची मागणी
राज्य सरकारने बायंंगिणी येथील कचरा प्रकल्प रद्द करावा यासाठी आपण मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंंत तसेच मंंत्री बाबुश मोन्सेरात यांचीही भेट घेऊन मागणी करणार आहे. सदर प्रकल्प हा चर्चच्या परिसरात आहे. जुने गोवे चर्च हे गोव्याचे प्रमुख पर्यटनस्थळ आहे. प्रकल्पाशेजारी घरेही आहेत. त्यामुळे ही जागा प्रकल्पासाठी योग्य नाही. सदर प्रकल्प अन्य ठिकाणी स्थलांंतरित‍ करावा, अशी मागणी आमदार या नात्याने आपण मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंंत यांच्याकडे करणार असल्याचे आमदार राजेश फळदेसाई यांनी सांगितले.‍‍

दरम्यान, बायंंगिणी येथे १ लाख ७१ हजार ३१२ चौ.मी. जागेत हा प्रकल्प होणार असून सदर जागा सर्वे नंंबर २०/१, २०/‍२,- ए आणि २०/‍३-ए (पी) या जागेत होणार आहे. दरम्यान, हरकती सादर करण्यासाठी १ महिन्याची मुदत देण्यात आली आहे.