शुल्लक कारणावरून कुडचडेत वृद्धाचा खून

संशयिताला अटक, सात दिवसांचा रिमांड

|
21st June 2022, 12:11 Hrs

सावर्डे : कुडचडे येथील शिल्लक कारणावरून उकरलेला वाद हातघाईवर आल्याने सुभाष परवार (६७) यांचा खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी तुळशीदास जना परवार याला अटक केली अाहे. संशयिताला केपे न्यायालयात हजर केले असता त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर घटना शनिवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. तुळशीदास परवार व सुभाष परवार एकमेकांचे नातेवाईक असून त्यांची पूर्वजांची जमीन आहे. त्या जमिनीत तुळशीदास यांनी नळजोडणी केली होती. त्यावरूनच संशयित तुळशीदास व सुभाष यांची बाचाबाची झाली. त्यानंतर प्रकरण हातघाईवार गेले. त्यात सुभाष परवार यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाची सुभाष परवार याचे पुत्र दामोदर परवार यांनी तुळशीदास परवार विरोधात कुडचडे पोलिसांत तक्रार नोंद केली. तुळशीदास परवार याला पोलिसांनी ३०२, ३२३, ५०४, ४२७ कलमांखाली गुन्हा नाेंद करून अटक केली. संशयिताला केपे न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी केपेचे उपअधीक्षक नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सगुण सावंत पुढील तपास करीत आहेत.