सांकवाळ येथे कारची वीजखांबाला धडक

|
21st June 2022, 12:07 Hrs
सांकवाळ येथे कारची वीजखांबाला धडक

दुभाजकावर उलटलेली कार व आडवा झालेला वीजखांब.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को :
चौपदरी महामार्गावरून दाबोळी विमानतळ मार्गाने मडगावकडे जाणाऱ्या एका इनोव्हा कारचालकाचे सांकवाळ-झुआरीनगर येथे नियंत्रण गेल्याने कारची रस्ता दुभाजकातील वीजखांबाला जोरदार धडक बसली. त्यामुळे वीजखांब काँक्रिट पायासकट रस्त्यावर आडवा झाला. तर कार दुभाजकावर उलटली. मात्र, सुदैवाने कारचालक सुखरूप राहिला. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.