केजीएफ-२ ट्रेलर २७ रोजी प्रदर्शित


03rd March 2022, 10:51 pm
केजीएफ-२ ट्रेलर २७ रोजी प्रदर्शित

२०१८ साली प्रदर्शित झालेल्या केजीएफ: चॅप्टर १ या कन्नड चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच केजीएफ २ ची वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे अनेक पोस्टर्सही रिलीज करण्यात आले आहेत. आता यश आणि संजय दत्त अभिनीत या चित्रपटाशी संबंधित आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
निर्मात्यांनी घोषणा केली आहे की, केजीएफ २ चा ट्रेलर २७ मार्च रोजी संध्याकाळी ६.४० वाजता प्रदर्शित होईल. या घोषणेसोबत चित्रपटाचे एक नवीन पोस्टर देखील शेअर करण्यात आले आहे, ज्यामध्ये यशचा लूक जोरदार दिसत आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे ‘वादळापूर्वी नेहमीच मेघगर्जना होते…’
कन्नड भाषेत बनलेला हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. केजीएफ २ यावर्षी १४ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. झी तमिळ, झी तेलुगू, झी केरलम आणि झी कन्नडने चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क विकत घेतले आहेत.
चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच यश आणि श्रीनिधी शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय रवीना टंडन आणि संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात संजय अधीराची नकारात्मक भूमिका साकारणार असून, त्याचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे. जी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. करोनामुळे चित्रपटाची रिलीज डेट अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे.