तेरेखोल येथे पावणे अकरा लाखांची दारू जप्त

|
13th February 2022, 11:56 Hrs
तेरेखोल येथे पावणे अकरा लाखांची दारू जप्त


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे : पेडणे पोलिसांनी तेरेखोल येथे हिलरॉक येथे अवैधरीत्या ठेवलेली पावणे अकरा लाख रुपये किमतीची दारू पेडणे पोलिसांनी जप्त केली. पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली पेडणे पोलिसांनी ही कारवाई केली.
निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात अबकारी विभागातर्फे विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या ठेवलेली दारूची तपासणी होत आहे. विधानसभा निवडणुकी‍दरम्यान सरकारने कोरडे दिवस जाहीर केल्याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये अनेक ठिकाणी साठवून ठेवली जाते. याच पार्श्वभूमीवर पेडणे पोलिसांनी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही दारू ताब्यात घेतली.