पुतीन आज भारतात

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ६ डिसेंबरला अत्यंत छोट्या पण महत्त्वाच्या दौऱ्यावर भारतात येत आहेत.

Story: दिल्ली : |
06th December 2021, 12:59 Hrs
पुतीन आज भारतात

दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ६ डिसेंबरला अत्यंत छोट्या पण महत्त्वाच्या दौऱ्यावर भारतात येत आहेत. अवघ्या काही तासांच्या या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातील संबंध पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर ऊर्जा ते अंतराळ तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्र निर्मिती क्षेत्रासह जवळपास डझनभर करारांवर शिक्कामोर्तब होणार आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष पुतीन दुपारी दिल्लीला पोहोचतील आणि ते फक्त ६-७ तास भारतात असतील. दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता मोदी आणि पुतीन यांच्यात बैठक होईल. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये प्रत्यक्ष आणि अनौपचारिक चर्चेाही होऊ शकते. नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर पुतीन उद्याच रात्री साडेनऊच्या सुमारास रशियाला रवाना होतील.