दोषी व्यक्तीला सोडणार नाही

योगी आदित्यनाथ : महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरण


22nd September 2021, 12:11 am
दोषी व्यक्तीला सोडणार नाही

दोषी व्यक्तीला सोडणार नाही
योगी आदित्यनाथ : महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरण
प्रयागराजः
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज प्रयागराजमधील वाघंबरी मठात पोहोचले. त्यांनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर योगी आदित्यनाथ यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महंतांच्या निधनाने दु:खी आहे. या प्रकरणाची अधिकारी चौकशी करत आहेत. दोषीला सोडणार नाही. त्याला नक्कीच शिक्षा होईल, असं मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले. महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केली आहे. नरेंद्र गिरी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल त्यांचा एक शिष्या आनंद गिरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेप्रकरणी अनेक पुरावे हाती आले आहेत. पोलिसांचे एक पथक, येथील विभागाचे एडीजी, आयजी आणि डीआयजी प्रयागराज, मडलायुक्त प्रयागराज हे सर्व अधिकारी मिळून काम करत आहेत. प्रत्येक घटनेचा पर्दाफाश केला जाईल आणि दोषीला शिक्षा दिली जाईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
गरज पडल्यास या प्रकरणी सीबीआय चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितलं. महंत नरेंद्र गिरी यांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते.

हेही वाचा