दोघा संशयितांना ७ दिवस पोलीस कोठडी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th July 2021, 12:43 Hrs

फोंडा : फेसबुकवरून मैत्री करून उत्तर गोव्यातील एका १९ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी  अटक केलेल्या उस्मान आलम सैय्यद (२६) आणि सैजू जॉय वर्गीस (२८) या संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी 

दिली. ही घटना  गेल्या जून महिन्यात घडली होती. संशयितांनी फेसबुकवरून त्या युवतीशी मैत्री करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. ती युवती   गरोदर राहिल्याने या घटनेला वाचा फुटली होती. फोंडा पोलीस या प्रकरणी कसून तपास करीत आहेत.